OpenAI First Office in India : एआय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स वेगाने आपलं आयुष्य व्यापत आहे. दिवसभरात एकदा तरी एआय हा शब्द तुमच्या कानावर पडत असेल. अनेक क्षेत्रात एआयचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत एआय क्षेत्रातील जागतिक कंपनी ओपनएआयने अखेर भारतात आपले पहिले ऑफिस उघडले आहे. राजधानी दिल्लीत कंपनीने एक ऑफिस भाड्याने घेतंल आहे.
चॅटजीपीटीची पालक कंपनी असलेल्या ओपनएआयने प्रीमियम वर्कस्पेस पुरवठादार 'कॉर्पोरेटएज' सोबत हा लीज करार केला आहे, अशी माहिती अहवालातून समोर आली आहे. कंपनीने या वर्षाच्या ऑगस्ट महिन्यातच भारतात ऑफिस उघडण्याची घोषणा केली होती.
भारतासाठी AI विकसित करण्याची योजना
ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमॅन यांनी ऑगस्टमध्येच ही माहिती दिली होती की, कंपनी भारतात आपले ऑफिस उघडण्याची योजना करत आहे. कंपनीचा उद्देश एआयला भारतासाठी अधिक विकसित करणे आणि या विकासात भारताला केंद्रस्थानी ठेवून एआय तयार करणे हा आहे. ओपनएआयने स्पष्ट केले आहे की, ती भारत सरकार, भारतीय व्यवसाय आणि येथील डेव्हलपर्ससोबत मिळून काम करण्यास उत्सुक आहे आणि यासाठी भारतात मोठी गुंतवणूक करण्यास तयार आहे.
दिल्लीतील ऑफिसचा पत्ता आणि सुविधा
ओपनएआयचे भारतात पहिले ऑफिस दिल्लीतील वर्ल्ड ट्रेड सेंटर, नारौजी नगर येथे सुरू झाले आहे. या ऑफिसमध्ये ४२,००० चौरस फूट पेक्षा अधिक प्रीमियम ऑफिस स्पेस उपलब्ध आहे. यात ५ हाय-टेक मीटिंग रूम्स आणि सुमारे ५०० वर्कस्टेशन्ससह इतर अनेक आधुनिक सुविधा आहेत.
वाचा - एकेकाळी दूरसंचार क्षेत्रात होतं वर्चस्व! आता २ लाख कोटी रुपये थकीत; सरकारकडे मदतीसाठी याचना
ओपनएआयसाठी दुसरी मोठा बाजारपेठ
ओपनएआयसाठी भारत हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठी बाजारपेठ आहे. युजर्सच्या संख्येच्या बाबतीत अमेरिकेनंतर भारत हा दुसरा सर्वात मोठा बाजार आहे. जगात चॅटजीपीटी वापरण्यात भारतीय विद्यार्थी सर्वात पुढे आहेत. ओपनएआयच्या या आगमनामुळे भारतातील एआय इकोसिस्टमला मोठी चालना मिळण्याची आणि रोजगार निर्मिती होण्याची शक्यता आहे.
