Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट

अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट

टॉर्चच्या चारही सदस्यांनी यापूर्वी आरोग्य तंत्रज्ञानाच्या जगात मोठ्या प्रकल्पांवर काम केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 19:13 IST2026-01-13T19:12:25+5:302026-01-13T19:13:36+5:30

टॉर्चच्या चारही सदस्यांनी यापूर्वी आरोग्य तंत्रज्ञानाच्या जगात मोठ्या प्रकल्पांवर काम केले आहे.

Open AI bought a team of just 4 people for 900 crores; Now ChatGPT will provide health reports | अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट

अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट

तंत्रज्ञानाच्या जगतात सगळे बडे सौदे सामान्य बाब आहे परंतु यावेळी जे घडलंय, त्याने संपूर्ण इंडस्ट्रीला विचार करण्यास भाग पाडलं आहे. जगातील सर्वात पॉप्युलर एआय कंपनी आणि ChatGPT उत्पादकाने एका छोट्या स्टार्टअपला खरेदी केले आहे. या टीममध्ये फक्त ४ लोक काम करतात. ऑफिस छोटे, उत्पादनही प्राथमिक टप्प्यात आहे परंतु त्याची किंमत जवळपास ९०० कोटी इतकी आहे.

हा स्टार्टअप हेल्थ टेकवर काम करत आहे. नाव आहे Torch..त्यात मानवी आरोग्याशी निगडित सर्व डेटा एकाच ठिकाणी समजण्यासारखे बनवायचे. म्हणजेच रिपोर्ट, औषधांची यादी, डॉक्टरांशी संपर्क, फिटनेस डेटा यासारखे सर्व काही एकाच सिस्टमशी जोडले असेल. जेणेकरून AI कुठल्याही मानवाच्या आरोग्याचा रिपोर्ट समजू शकतो. आता ही ४ जणांची टीम थेट जगातील सर्वात मोठ्या एआय कंपनीत समाविष्ट झाली आहे. त्यांचे काम आता नवीन मिशन बनले आहे. हे काम चॅट बेस्ड एआयला हेल्थ असिस्टेंट बनवण्याचं आहे. या ४ लोकांच्या टीमसाठी अखेर इतकी मोठी रक्कम का दिली असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

AI आणि हेल्थ

सध्या आरोग्य डेटा हा जगातील सर्वत्र विखुरलेला डेटा आहे. वेगवेगळी रुग्णालये, वेगवेगळे अॅप्स, वेगवेगळे रिपोर्ट, वेगवेगळ्या फाइल्स. मानव स्वतः त्यांचे संपूर्ण आरोग्य रेकॉर्ड एकाच ठिकाणी ठेवू शकत नाही. हे कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी आणखी मोठे आव्हान आहे. Torch ची संपूर्ण तंत्रज्ञान हीच समस्या सोडवण्यासाठी तयार करण्यात आली होती. आरोग्य डेटा एकत्रित करणे, जेणेकरून मशीन्स केवळ प्रश्नांची उत्तरे देत नाहीत तर एखाद्या व्यक्तीची संपूर्ण वैद्यकीय कहाणी समजून घेतात आणि त्यांच्या आरोग्याचे विश्लेषण करतात. एआयचे जग आता फक्त प्रश्न-उत्तरांपुरते मर्यादित राहू इच्छित नाही. पुढचे मोठे क्षेत्र म्हणजे आरोग्य. लोकांना त्यांचे हेल्थ रिपोर्ट समजून घ्यायचे आहेत, औषधांच्या परिणामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करायचे आहे. फिटनेस आणि रोगाचे नमुने समजून घ्यायचे आहेत आणि ते डॉक्टरांव्यतिरिक्त डिजिटल सहाय्यकाकडून हे सर्व अपेक्षा करत आहेत. येथेच या कराराचे खरे कारण स्पष्ट होते. ही केवळ कंपनी खरेदी करण्याबद्दल नाही. भविष्यातील आरोग्य बाजारपेठेत एक प्रमुख स्थान मिळवण्याबद्दल आहे.

दरम्यान, या कराराला इंडस्ट्रीत टॅलेंट अधिग्रहण म्हणून संबोधले जात आहे. म्हणजेच तंत्रज्ञानापेक्षा टीमला खरेदी केले आहे. टॉर्चच्या चारही सदस्यांनी यापूर्वी आरोग्य तंत्रज्ञानाच्या जगात मोठ्या प्रकल्पांवर काम केले आहे. त्यांना रुग्णालये, क्लिनिक नेटवर्क आणि वैद्यकीय डेटा सिस्टमची सखोल समज आहे. हा अनुभव आता एआय कंपनीच्या आरोग्य प्रकल्पांवर लागू केला जाईल. ओपनएआयने अलीकडेच एक नवीन आरोग्य विभाग सुरू केला आहे जिथे युजर आरोग्य रिपोर्ट अपलोड करू शकतात आणि एआयला प्रश्न विचारू शकतात. 

Web Title : OpenAI ने 4 लोगों की टीम को 900 करोड़ में खरीदा; ChatGPT देगा हेल्थ रिपोर्ट!

Web Summary : OpenAI ने हेल्थ टेक स्टार्टअप Torch को 900 करोड़ में खरीदा, जिसमें केवल 4 लोग हैं। अब ChatGPT स्वास्थ्य डेटा को एकीकृत करके व्यक्तिगत स्वास्थ्य रिपोर्ट देगा, जिससे स्वास्थ्य सेवा में क्रांति आएगी।

Web Title : OpenAI Buys 4-Person Team for $108 Million; ChatGPT Health Reports!

Web Summary : OpenAI acquired Torch, a four-person health tech startup, for $108 million. Torch's AI will integrate health data, enabling ChatGPT to provide personalized health reports and insights, revolutionizing healthcare access.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.