lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > चुकीच्या मोबाइलवर पैसे पाठविले? रक्कम परत मिळणार; वाचा प्रक्रिया

चुकीच्या मोबाइलवर पैसे पाठविले? रक्कम परत मिळणार; वाचा प्रक्रिया

चिंतेचे कारण नाही, बँकेला पुरावे दिल्यास पैसे पुन्हा तुमच्या खात्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 10:36 AM2024-02-20T10:36:27+5:302024-02-20T10:38:39+5:30

चिंतेचे कारण नाही, बँकेला पुरावे दिल्यास पैसे पुन्हा तुमच्या खात्यात

online payment Sent money to wrong mobile? The amount will be refunded Read the process | चुकीच्या मोबाइलवर पैसे पाठविले? रक्कम परत मिळणार; वाचा प्रक्रिया

चुकीच्या मोबाइलवर पैसे पाठविले? रक्कम परत मिळणार; वाचा प्रक्रिया

नवी दिल्ली : यूपीआयद्वारे पैसे पाठविताना अनेकदा नजरचुकीने चुकीचा मोबाईल क्रमांक दाबला जातो. त्यामुळे चुकीच्या व्यक्तीला पैसे हस्तांतरित होतात. अशावेळी आपल्याला पैसे परत मिळू शकतात का? चला याबाबत जाणून घेऊया.

पैसे हस्तांतरित करताना आपल्या हँडसेटमध्ये संचयित असलेल्या मोबाईल क्रमांकाचा वापर केल्यास, चुकीच्या व्यक्तीला पैसे जाण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. मात्र, क्रमांक

मोबाइलच्या फोनबुकमध्ये नसेल, तर थेट क्रमांक टाकून तुम्ही पैसे पाठवू शकता. मात्र, त्यात एक आकडाही चुकीचा दाबला गेला, तरी चुकीच्या व्यक्तीला पैसे पाठविले जातात.

नकार दिल्यास?

त्यात मुख्य अडचण अशी असते की, तुम्ही त्या व्यक्तीला ओळखत नसता. अशावेळी तुम्ही त्या व्यक्तीस लगेच फोन करून झालेला प्रकार सांगून पैसे परत करण्याची विनंती करू शकता. त्याने पैसे परत केले नाही, तर मात्र तुम्हाला नियमांनुसार प्रक्रिया पार पाडावी लागेल.

बँकेला माहिती द्या

तज्ज्ञांनी सांगितले की, चुकून भलत्याच व्यक्तीला पैसे पाठविले गेल्याची तक्रार तुमच्या बँकेकडे तातडीने करा. पैसे पाठविल्याशी संबंधित पुरावे बँक तुमच्याकडे मागेल. खात्री पटल्यानंतर तुमचे पैसे परत मिळविण्याची प्रक्रिया बँकेकडून सुरू करण्यात येईल.

तक्रार कुठे करावी?

चुकीच्या हस्तांतरणाची तक्रार ‘एनपीसीआय’च्या वेबसाईटवरीही करता येऊ शकते. https://www.npci.org.in असा वेबसाईटचा पत्ता आहे. या वेबसाईटवरील तक्रार निवारण सेक्शनमध्ये जाऊन आपली तक्रार नोंदविता येते.

Web Title: online payment Sent money to wrong mobile? The amount will be refunded Read the process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.