Lokmat Money > बिझनेस न्यूज > Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?

Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?

Ola Zero Commission Model: ओलाने मोठा निर्णय घेतला आहे. आता कंपनीनं आपल्या ड्रायव्हर पार्टनरकडून कोणतंही कमिशन घेणार नाही. हा नियम संपूर्ण देशात लागू करण्यात आलाय.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 12:09 IST2025-06-18T12:07:38+5:302025-06-18T12:09:46+5:30

Ola Zero Commission Model: ओलाने मोठा निर्णय घेतला आहे. आता कंपनीनं आपल्या ड्रायव्हर पार्टनरकडून कोणतंही कमिशन घेणार नाही. हा नियम संपूर्ण देशात लागू करण्यात आलाय.

ola launches zero commission model what is this facility how will it benefit drivers | Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?

Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?

Ola Zero Commission Model: ओलाने मोठा निर्णय घेतला आहे. आता कंपनीनं आपल्या ड्रायव्हर पार्टनरकडून कोणतंही कमिशन घेणार नाही. हा नियम संपूर्ण देशात लागू करण्यात आलाय. यामुळे ओलाशी संबंधित १० लाखांहून अधिक ड्रायव्हर आपली पूर्ण कमाई ठेवू शकणार आहेत. त्यांना त्यांच्या कमाईचा कोणताही भाग ओलाला द्यावा लागणार नाही. ड्रायव्हर पार्टनर्सना अधिक फायदा देण्यासाठी ओलानं हे पाऊल उचलल्याचं म्हटलं जातंय.

ड्रायव्हर आता स्वत: प्लॅन निवडू शकतात. कोणत्याही कपातीशिवाय ते पूर्ण भाडं आपल्याकडे ठेवू शकतात. यापूर्वी ओला ड्रायव्हर सहकाऱ्यांकडून कमिशन घेत असे. परंतु, आता हे कमिशन पूर्णपणे काढून टाकण्यात आलं आहे. रिक्षा, बाईक आणि कॅब सेवांना हा नियम लागू असेल, असं ओलानं म्हटलंय. 

किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ

ओला कन्झ्युमरच्या एका प्रवक्त्यानं यासंदर्भातील माहिती दिली. "संपूर्ण भारतात शून्य कमिशन मॉडेलची सुरुवात आमच्या प्रवासी सवांच्या व्यवसायात एक महत्त्वाचा बदल आहे. कमिशन हटवल्यामुळे ड्रायव्हर्सन अधिक अधिकार आणि संधी मिळतील," असं ते म्हणाले.

कसं लागू झालं नवं मॉडेल?

ओलानं सांगितलं की, हे नवीन कमिशन मॉडेल हळूहळू लागू करण्यात आलंय. प्रथम ते ओला ऑटोमध्ये सुरू करण्यात आलं. नंतर ते ओला बाईक्स आणि ओला कॅबमध्येही लागू करण्यात आलं. ओलाच्या या निर्णयाचा ड्रायव्हर भागीदारांना खूप फायदा होईल. ते त्यांच्या कमाईचा मोठा वाटा स्वतःकडे ठेवू शकतील. यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल, असं कंपनीचं म्हणणं आहे.

काय आहे झिरो कमिशन मॉडेल?

ओलाचे ०% कमिशन मॉडेल ही एक व्यावसायिक रणनीती आहे ज्यामध्ये कंपनी पूर्वीप्रमाणे चालकांकडून त्यांच्या प्लॅटफॉर्मचा वापर केल्याबद्दल प्रत्येक राईडला कमिशन आकारणार नाही. ०% कमिशन मॉडेल अंतर्गत, ओला आता प्रत्येक राईडमधून कोणतंही कमिशन कापणार नाही. त्याऐवजी, ओला प्लॅटफॉर्म वापरण्यासाठी ड्रायव्हर्सकडून निश्चित शुल्क किंवा सबस्क्रिप्शन शुल्क आकारेल. हे निश्चित शुल्क दररोज, आठवड्याला, मासिक किंवा वापराच्या आधारावर असू शकतं. 

Web Title: ola launches zero commission model what is this facility how will it benefit drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Olaओला