Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > ऑक्टोबरची परीक्षा लोडशेडींग मुक्त !

ऑक्टोबरची परीक्षा लोडशेडींग मुक्त !

By admin | Updated: September 12, 2014 22:38 IST2014-09-12T22:38:53+5:302014-09-12T22:38:53+5:30

October test loadings free! | ऑक्टोबरची परीक्षा लोडशेडींग मुक्त !

ऑक्टोबरची परीक्षा लोडशेडींग मुक्त !

>हायकोर्ट : आवश्यक तेथे जनरेटर वापरा
मुंबई : दहावी व बारावीची ऑक्टोबरला परीक्षा लोडशेडिंग मुक्त होणार आह़े सर्व परीक्षा केंद्रांवर विना खंडीत वीज पुरवठा करण्याचे उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य शासनाला दिले आहेत़
वीज पुरवठा करण्यासाठी आवश्यक तेथे जनरेटरचा वापर करा, पण विद्यार्थ्यांवर विना वीज परीक्षा देण्याची वेळ आणू नका, असेही न्या़ अभय ओक यांच्या खंडपीठाने शासनाला बजावले आह़े प्रत्येक परीक्षा केंद्रांवर अधिकारी नेमून परीक्षा काळात वीज पुरवठा खंडीत होणार नाही यासाठी जनरेटर व्यतिरिक्त काही करता येईल का हेही तपासा व त्याचा अहवाल न्यायालयात सादर करा, असेही न्यायालयाने शासनाला सांगितल़े सुनावणीला शिक्षण सचिवही हजर होत़े परीक्षा केंद्रांवर वीज पुरवठा सुरळीत केला जात असल्याचे सरकारी वकील व्ही़ पी़ मालवणकर यांनी न्यायालयाला सांगितल़े त्यावर नाराजी व्यक्त करत न्यायालयाने उपरोक्त आदेश दिल़े
नवी मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते विष्णू गवळी यांनी ही जनहित याचिका केली आह़े दहावी व बारावीच्या परीक्षा काळात परीक्षा केंद्रांवर लोडशेडिंग करू नका, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आह़े त्यावर प्रत्येक परीक्षा केंद्रांवर वीज पुरवठा करण्याचे आदेश न्यायालयाने 2008 मध्ये दिले होत़े मात्र या आदेशाची पूर्णपणे अंमलबजावणी होत नसल्याने शासनावर न्यायालयाच्या अवमानाची कारवाई करावी, अशी मागणी करणारी स्वतंत्र याचिका गवळी यांनी न्यायालयात सादर केली़ त्याची दखल घेत न्यायालयाने हे आदेश दिल़े (प्रतिनिधी)

Web Title: October test loadings free!