Aadhaar Face Authentication: आता तुमचा चेहराच तुमचं आधार कार्ड असेल. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. आता तुम्हाला सगळीकडे आधार कार्ड दाखवावं लागणार नाही. म्हणजेच आता कागदी गडबड संपुष्टात येईल, ज्यामुळे सेवा जलद आणि सुरक्षित होतील. हे सर्व फेस ऑथेंटिकेशनद्वारे शक्य होणार आहे, ज्याद्वारे ओळख पटवली जाईल. आता खासगी कंपन्याही आधार व्हेरिफिकेशन करू शकतील, ज्यामुळे बँकिंग, ट्रॅव्हल, हेल्थकेअर आणि ई-कॉमर्स सारख्या सेवा आयडी प्रूफ दाखवल्याशिवाय उपलब्ध होऊ शकतील.
फेसद्वारे होणार आधार ऑथेंटिकेशन
आता सेवांसाठी आधार कार्ड किंवा प्रत्यक्ष कागदपत्रे दाखवण्याची गरज भासणार नाही. फेस ऑथेंटिकेशनमुळे ओळखीची पडताळणी होईल, ज्यामुळे प्रक्रिया जलद होईल आणि समस्या निर्माण होणार नाही.
खासगी कंपन्याही ऑथेंटिकेशन करू शकणार
यापूर्वी आधार ऑथेंटिकेशन केवळ सरकारी सेवेपुरते मर्यादित होतं, मात्र आता खासगी कंपन्यांनाही ही सुविधा देण्यात आली आहे. ई-कॉमर्स, ट्रॅव्हल, हॉस्पिटॅलिटी, हेल्थकेअर, बँकिंग आणि इन्शुरन्स या सारख्या क्षेत्रांमध्ये खासगी कंपन्या आता आधार ऑथेंटिकेशनद्वारे सेवा देऊ शकतील.
'ईज ऑफ लिव्हिंग'ला प्रोत्साहन
सुलभ आणि जलद सेवेमुळे 'ईज ऑफ लिव्हिंग'ला चालना मिळेल. आधार ऑथेंटिकेशनची व्याप्ती वाढविल्यास नागरिकांचं जीवन सुलभ होईल. कमी कागदपत्रं, जलद सेवा आणि अधिक सुरक्षितता यामुळे सेवा आता अधिक सोयीस्कर होणार आहेत.
विलंब नाही
बनावट कागदपत्रे किंवा चुकीची ओळख होण्याची समस्या संपेल, कारण फेस ऑथेंटिकेशन हा सर्वात सुरक्षित मार्ग आहे. जलद, अचूक आणि पूर्णपणे सुरक्षित ऑथेंटिकेशन नागरिकांना विश्वासार्ह सेवा प्रदान करेल.
डेटा पूर्णपणे सुरक्षित असेल
फेस-बेस्ड ऑथेंटिकेशनला सरकार मान्यता देईल आणि पूर्णपणे सुरक्षित असेल. यूआयडीएआय फेस ऑथेंटिकेशनची व्याप्ती झपाट्याने वाढत आहे. संमतीशिवाय कुठेही डेटा वापरला जाणार नाही, ज्यामुळे गोपनीयता राखली जाईल.