Lokmat Money > बिझनेस न्यूज > किमान शिल्लक नसल्यास आता कॅनरा बँकेत दंड नाही; लाखो ग्राहकांना होणार निर्णयाचा लाभ

किमान शिल्लक नसल्यास आता कॅनरा बँकेत दंड नाही; लाखो ग्राहकांना होणार निर्णयाचा लाभ

पूर्वी बँकेच्या खातेदारांना त्यांच्या खात्याच्या प्रकारानुसार किमान सरासरी मासिक शिल्लक ठेवावी लागत असे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 09:47 IST2025-06-03T09:47:15+5:302025-06-03T09:47:39+5:30

पूर्वी बँकेच्या खातेदारांना त्यांच्या खात्याच्या प्रकारानुसार किमान सरासरी मासिक शिल्लक ठेवावी लागत असे

Now there is no penalty in Canara Bank for not having minimum balance; Lakhs of customers will benefit from the decision | किमान शिल्लक नसल्यास आता कॅनरा बँकेत दंड नाही; लाखो ग्राहकांना होणार निर्णयाचा लाभ

किमान शिल्लक नसल्यास आता कॅनरा बँकेत दंड नाही; लाखो ग्राहकांना होणार निर्णयाचा लाभ

बंगळुरू: भारतातील आघाडीच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक कॅनरा बँकेने ऐतिहासिक निर्णय घेत सर्व प्रकारच्या बचत खात्यांसाठी किमान शिल्लक न ठेवण्यासंबंधीचे शुल्क पूर्णपणे माफ केल्याची घोषणा केली आहे. ही योजना १ जून २०२५ पासून लागू होणार आहे. त्यामुळे बँकेकडून विविध प्रकारच्या बचत खात्यांमध्ये किमान शिल्लक न ठेवण्यास कोणत्याही प्रकारचा दंड आकारला जाणार नाही.

पूर्वी बँकेच्या खातेदारांना त्यांच्या खात्याच्या प्रकारानुसार किमान सरासरी मासिक शिल्लक ठेवावी लागत असे. हे निकष पूर्ण न केल्यास दंड आकारला जात असे. हा नियम जवळपास सर्वच बँकाकडून लागू करण्यात आला आहे. परंतु या नवीन धोरणामुळे कॅनरा बँकेचे सर्व बचत खातेदारांना अशा प्रकारचे कोणताही दंड न भरता मुक्तपणे खाते वापरता येईल.

कॅनरा बँकेना घेतलेल्या या निर्णयाचा लाभ लाखो ग्राहकांना होणार आहे. कॅनरा बँकेच्या ग्राहकांमध्ये नोकरदार, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, एनआरआय तसेच प्रथमच बँकिंग सेवा वापरणाऱ्यांचा समावेश आहे. बँकेने आपल्या शंभर वर्षांच्या प्रवासात विकासाचे विविध टप्पे पार केले आहेत. १९६९ मध्ये राष्ट्रीयीकरणानंतर बँक विलक्षण वेगाने वाढली. पुढच्या काळात ही बँक जागतिक स्तरावर पोहोचली तसेच विविध ग्राहक वर्गांना सेवा पुरवू लागली आहे.

Web Title: Now there is no penalty in Canara Bank for not having minimum balance; Lakhs of customers will benefit from the decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक