Lokmat Money > बिझनेस न्यूज > आता फ्रॉड नंबर लगेच कळणार! RBI'चे बँकांना निर्देश;ग्राहकांना फक्त 'या' नंबरवरुन कॉल येणार

आता फ्रॉड नंबर लगेच कळणार! RBI'चे बँकांना निर्देश;ग्राहकांना फक्त 'या' नंबरवरुन कॉल येणार

आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी, आरबीआयने बँकांना विशेष सूचना जारी केल्या आहेत. ग्राहकांना कॉल करण्यासाठी १६०० फोन नंबर सिरीजऐवजी बँकांना प्रमोशनसाठी १४० फोन नंबर सिरीज वापरण्यास सांगण्यात आले आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 13:21 IST2025-01-18T13:06:51+5:302025-01-18T13:21:37+5:30

आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी, आरबीआयने बँकांना विशेष सूचना जारी केल्या आहेत. ग्राहकांना कॉल करण्यासाठी १६०० फोन नंबर सिरीजऐवजी बँकांना प्रमोशनसाठी १४० फोन नंबर सिरीज वापरण्यास सांगण्यात आले आहे. 

Now fraud numbers will be known immediately RBI instructs banks Customers will only receive calls from this number | आता फ्रॉड नंबर लगेच कळणार! RBI'चे बँकांना निर्देश;ग्राहकांना फक्त 'या' नंबरवरुन कॉल येणार

आता फ्रॉड नंबर लगेच कळणार! RBI'चे बँकांना निर्देश;ग्राहकांना फक्त 'या' नंबरवरुन कॉल येणार

आरबीआयने बँकांना नवीन सूचना दिल्या आहेत. बँका आता ग्राहतकांना फोन करण्यासाठी विशेष नंबर वापरणार आहेत. व्यवहारासाठी ग्राहकांना कॉल करण्यासाठी फक्त '१६००' फोन नंबर सिरीज वापरण्यास आरबीआयने बँकांना सांगितले आहे. जर बँका आणि इतर नियमन केलेल्या संस्था प्रमोशनल उद्देशाने ग्राहकांना कॉल किंवा एसएमएस करत असतील तर त्यांनी '१४०' फोन नंबर सिरीज वापरावी.

Infosys च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, नारायण मूर्ती कुटुंबाला ₹१९०० कोटींचं नुकसान

आरबीआय आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी नवीन नियम अंबलात आणत आहे. यामुळे आर्थिक फसवणुकीला आळा बसेल असा आरबीआयचा विश्वास आहे. याशिवाय, आरबीआयने बँका आणि इतर नियमन केलेल्या संस्थांना त्यांच्या ग्राहकांच्या डेटाबेसचे निरीक्षण करण्यास आणि अनावश्यक डेटा काढून टाकण्यास सांगितले आहे.

बँकांना जारी केलेल्या परिपत्रकात, आरबीआयने त्यांना योग्य पडताळणीनंतर नोंदणीकृत मोबाइल नंबर अपडेट करण्यास आणि रद्द केलेल्या मोबाइल नंबरशी जोडलेल्या खात्यांचे निरीक्षण वाढविण्यास सांगितले आहे जेणेकरून लिंक केलेली खाती फसवणूक होऊ नयेत.

आरबीआयने ३१ मार्च २०२५ पूर्वी सूचनांचे पालन करण्यास सांगितले आहे. डिजिटल व्यवहारांच्या प्रसारामुळे ग्राहकांना सुविधा मिळाल्या आहेत पण त्यामुळे फसवणुकीतही वाढ झाली आहे, असे आरबीआयने म्हटले आहे.

आरबीआयने सर्व बँकांना सर्व विद्यमान आणि नवीन खाती आणि लॉकर्समध्ये नामांकित व्यक्तीची खात्री करण्यास सांगितले. मध्यवर्ती बँकेने म्हटले आहे की, मोठ्या संख्येने खात्यांना नामांकित व्यक्ती नाही. खातेधारकाच्या मृत्यूनंतर कुटुंबातील सदस्यांना होणारा त्रास कमी करणे आणि दाव्यांचे जलद निपटारा करणे हे उद्दिष्ट आहे.

ग्राहकांना नामांकन सुविधेचा लाभ घेता यावा यासाठी बँका खाते उघडण्याच्या फॉर्ममध्ये योग्य त्या सुधारणा करू शकतात, असे आरबीआयने म्हटले आहे. बँका आणि एनबीएफसींनीही बँक खात्यांमध्ये नामांकित व्यक्तींची संख्या सुनिश्चित करण्यासाठी मोहिमा सुरू कराव्यात, असंही यात म्हटले आहे.

Web Title: Now fraud numbers will be known immediately RBI instructs banks Customers will only receive calls from this number

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.