lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > आता दर आठवड्याला LPG गॅसच्या किंमती बदलणार, दरात चढ-उतार होणार 

आता दर आठवड्याला LPG गॅसच्या किंमती बदलणार, दरात चढ-उतार होणार 

तेल कंपन्यांना होत असलेल्या नुकसानीसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते. गेल्या महिनाअखेपर्यंत गॅसच्या किंमती कमी होत्या, त्यामुळे तेल कंपन्याना नुकसान सहन करावे लागले

By महेश गलांडे | Published: December 22, 2020 12:21 PM2020-12-22T12:21:45+5:302020-12-22T12:23:17+5:30

तेल कंपन्यांना होत असलेल्या नुकसानीसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते. गेल्या महिनाअखेपर्यंत गॅसच्या किंमती कमी होत्या, त्यामुळे तेल कंपन्याना नुकसान सहन करावे लागले

Now every week gas prices will change, prices will fluctuate by oil companies | आता दर आठवड्याला LPG गॅसच्या किंमती बदलणार, दरात चढ-उतार होणार 

आता दर आठवड्याला LPG गॅसच्या किंमती बदलणार, दरात चढ-उतार होणार 

Highlightsतेल कंपन्यांना होत असलेल्या नुकसानीसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते. गेल्या महिनाअखेपर्यंत गॅसच्या किंमती कमी होत्या, त्यामुळे तेल कंपन्याना नुकसान सहन करावे लागले

नवी दिल्ली - सर्वसामान्यांच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत आता दर आठवड्याला बदल होण्याची शक्यता आहे. कारण, तेल कंपन्यांकडून आता प्रत्येक आठवड्याला गॅस सिलेंडरच्या किंमतींचे परीक्षण होईल. त्यानुसार, सिलेंडरचे दर कमी-जास्त करण्यात येतील. त्यासाठी, सार्वजनिक तेल कंपन्यांसह वितरक एजन्सींच्या व्यवस्थापकांकडून काम सुरू करण्यात आल्याची माहिती आहे. यापूर्वी एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत महिन्यात केवळ एकदाच निश्चित करण्यात येत होती. मात्र, आता पेट्रोलच्या किंमतीनुसार गॅस सिलेंडरच्याही दरवाढीचा निर्णय दर आठवड्याला होणार आहे. 

तेल कंपन्यांना होत असलेल्या नुकसानीसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते. गेल्या महिनाअखेपर्यंत गॅसच्या किंमती कमी होत्या, त्यामुळे तेल कंपन्याना नुकसान सहन करावे लागले. मात्र, आता नवीन नियमावली लागू झाल्यानंतर केवळ एक आठवड्यातच यावर निर्णय होणार आहे, त्यामुळे कंपन्यांना नुकसान टाळता येईल. 

दरम्यान, याच महिन्यात दोनवेळा एलपीजी गॅसच्या किंमतीत वाढ झाली आहे. मंगळवारी या वाढीव किंमतीचे परीक्षण झाले, त्यानुसारच इथून पुढे दर आठवड्याला या किंमती निश्चित करण्याचे ठरविण्यात आले आहे. या निर्णयामुळे तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागेल, असेही काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, या नवीन नियमावलीसाठी अधिकृत सूचना प्राप्त झाली नाही. मात्र, गॅस एजन्सीचे संचालक नवीन नियमावलींसाठी आग्रही आहेत. 

किंमत वाढली पण अनुदान तेवढेच

विना अनुदानित घरगुती सिलिंडरची किंमत वाढविल्यानंतर सबसिडी वाढते, असा ग्राहकांचा नेहमीचा अनुभव आहे. पण डिसेंबर महिन्यात १०० रुपये दरवाढ केल्यानंतरही ग्राहकांच्या बँक खात्यात नोव्हेंबरएवढीच सबसिडी जमा होत आहे. घरगुती सिलेंडरच्या किंमतीत गेल्या 15 दिवसांत 100 रुपयांची वाढ झाली आहे, पण ग्राहकांच्या खात्यात केवळ 40.10 रुपयेच जमात होत आहेत. त्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम असून तेल कंपन्यांचा अजब न्याय असल्याचे सांगत दाद कुणाकडे मागावी, अशी सवाल उपस्थित करीत आहेत.
 

Web Title: Now every week gas prices will change, prices will fluctuate by oil companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.