Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?

कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?

तीन वर्षांत देणग्यांमध्ये ८५% वाढ, एका वर्षात उद्योजकांचे १० हजार कोटींचे दान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 10:48 IST2025-11-07T10:38:51+5:302025-11-07T10:48:00+5:30

तीन वर्षांत देणग्यांमध्ये ८५% वाढ, एका वर्षात उद्योजकांचे १० हजार कोटींचे दान

Not only earning but also donating 7 crores a day Shiv Nadar topples the list of Indian donorsambani adani | कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?

कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: भारतात उद्योजक भरमसाठ कमवतात. हे आपण अनेकदा ऐकले आहे; पण ते भरमसाठ दानही करतात, हेही पाहायला मिळत आहे आणि ही रक्कम लाखोंमध्ये नाही, कोटींमध्ये आहे. एडेलगिव्ह-हुरून फिलांथ्रॉपी लिस्ट २०२५ मधील आकडेवारीनुसार भारतीय उद्योजकांनी एका वर्षात १०,३८० कोटी रुपये दान केले आहेत. तीन वर्षांत दान केलेल्या रकमेत ८५ टक्के वाढ झाली आहे.

या यादीत शिव नाडर (एचसीएल टेक्नॉलॉजीज) पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांनी गेल्या वर्षी २,७०८ कोटी रुपये दान केले. म्हणजे दर दिवसाला सरासरी ७.४ कोटी रुपये दान केले आहेत. गेल्या पाच वर्षांत शिव नाडर परिवाराचे समाजकारणातील एकूण योगदान- १०,१२२ कोटी रुपये आहे. शिक्षण, ग्रामीण मुले आणि रिसर्च यासाठी त्यांनी रक्कम दान केली आहे.

भारतातील टॉप टेन दानशूर (२०२५ वर्षातील देणगी)

नाव देणगी  -  (कोटी रु.)  -  दररोज (कोटी रु.)

  • शिव नाडर आणि परिवार     २,७०८     ७.४
  • मुकेश अंबानी आणि परिवार     ६२६     १.७
  • बजाज परिवार     ४४६     १.२
  • कुमार मंगलम बिर्ला आणि परिवार     ४४०     १.२
  • गौतम अदानी आणि परिवार     ३८६     १.१
  • नंदन निलेकणी     ३६५     १.०
  • हिंदुजा परिवार     २९८     ०.८
  • रोहिणी निलेकणी     २०४     ०.६
  • सुधीर मेहता आणि समीर मेहता     १८९     ०.५
  • सायरस पुनावाला, आदर पुनावाला     १७३     ०.५

Web Title: Not only earning but also donating 7 crores a day Shiv Nadar topples the list of Indian donorsambani adani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.