lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > गडकरींची विधेयकास मंजुरी, ऑक्टोबरपासून सर्वच कारमध्ये 6 एअरबॅग कंपल्सरी

गडकरींची विधेयकास मंजुरी, ऑक्टोबरपासून सर्वच कारमध्ये 6 एअरबॅग कंपल्सरी

कारमध्ये वाढीव एअरबॅग अनिवार्य केल्यामुळे कारच्या किंमतीवरही त्याचा परिणाम होणार आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 11:18 AM2022-03-29T11:18:18+5:302022-03-29T11:19:03+5:30

कारमध्ये वाढीव एअरबॅग अनिवार्य केल्यामुळे कारच्या किंमतीवरही त्याचा परिणाम होणार आहे

Nitin Gadkari approves bill, 6 airbags compulsory in all cars from October | गडकरींची विधेयकास मंजुरी, ऑक्टोबरपासून सर्वच कारमध्ये 6 एअरबॅग कंपल्सरी

गडकरींची विधेयकास मंजुरी, ऑक्टोबरपासून सर्वच कारमध्ये 6 एअरबॅग कंपल्सरी

नवी दिल्ली - देशातील सर्वच नवीन कारमध्ये 1 ऑक्टोबर 2022 पासून 6 एअरबॅग असणे अनिवार्य असल्याचे केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. रस्ते व राजमार्ग मंत्रालयाने जानेवारी महिन्यात एक विधेयकास मंजुरी दिली होती. त्यानुसार, 8 प्रवाशांची वाहतूक क्षमता असलेली आणि 3.5 टन पेक्षा कमी वजन असणाऱ्या सर्वच कारमध्ये 6 एअर बॅग अनिवार्य असणार आहेत. त्यामुळे, 1 ऑक्टोबरपासून सर्वच वाहनात ड्युअर फ्रंट एअरबॅग अनिवार्य करण्यात आल्या आहेत. 

कारमध्ये वाढीव एअरबॅग अनिवार्य केल्यामुळे कारच्या किंमतीवरही त्याचा परिणाम होणार आहे. ऑटो एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार या नियमामुळे कारच्या किंमती 50 हजार रुपयांनी वाढू शकतात. सध्याच्या कार मॉडेलमध्ये साईड आणि कर्टेन एअरबॅगची कमतरता जाणवते. त्यामुळे, बॉडी पॅनेल आणि इंटेरियर ट्रीममध्येही काही बदल होऊ शकतात. ज्यामुळे गाडीच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सध्या गाड्यांमध्ये मीड-व्हेरिएंट आणि टॉप वेरिएंट मध्ये 6 एअरबॅग देण्यात येत आहेत. उदाहरणार्थ, नुकतेच लाँच झालेल्या मारुती बलेनो कारचे टॉप दोन व्हेरिएंट 6 एयरबॅगने आहेत. इंडो-जापानी ऑटोमेकर लवकरच अपडेटेड Ertiga, XL6, Ciaz आणि अपकमिंग मिड-साइज SUV मॉडल लाइनअपवर 6 एयरबॅग देत आहे. Hyundai Creta आणि Verna च्या टॉप-अँड व्हेरिएंट साइड आणि कर्टेन एयरबॅग्ससह बाजारात आल्या आहेत. तसेच, महिंद्राची 5-स्टार ग्लोबल एनसीएपी रेटेड-एक्सयूवी300 आणि एक्सयूवी 700 - क्रमशः 6 आणि 7 एयरबॅगनेच येते. एमजीच्या सर्वच टॉप मॉडेल्सचे व्हेरिएंट 6 एअरबॅग्सनेच बाजारात उतरल्या आहेत. टाटा हॅरियर एक्सजेड ट्रिम, ज्याची किंमत 18.35 लाख रुपये आहे, ही 6 एयरबॅग देणारी घरेलू ऑटोमेकरची सर्वात स्वस्त कार आहे. 

Web Title: Nitin Gadkari approves bill, 6 airbags compulsory in all cars from October

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.