Aadhaar Updates: जर तुम्हाला नवीन आधार कार्ड बनवायचं असेल किंवा जुन्या आधारमधील नाव, पत्ता किंवा फोटो बदलायचा असेल तर आता तुम्हाला नव्या नियमांची काळजी घ्यावी लागणार आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणानं (UIDAI) २०२५-२६ साठी आधार अपडेट करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची नवीन यादी जाहीर केली आहे.
यूआयडीएआयनं हेदेखील स्पष्ट केलंय की, जर एखाद्याच्या नावावर चुकून दोन किंवा अधिक आधार क्रमांक तयार झाले असतील तर प्रथम जारी केलेलं आधार वैध मानलं जाईल. इतर सर्व आधार क्रमांक रद्द करण्यात येणार आहेत.
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
आवश्यक कागदपत्रे कोणती?
ओळखपत्र – याअंतर्गत पासपोर्ट, पॅन कार्ड (वैध ई-पॅन कार्ड), मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, शासकीय/शासकीय उपक्रमाने जारी केलेलं फोटो आयडी, नरेगा जॉब कार्ड, पेन्शनर ओळखपत्र, केंद्र सरकारची आरोग्य योजना/ माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना कार्ड, ट्रान्सजेंडर ओळखपत्र कागदपत्रं म्हणून दाखवू शकता.
पत्त्याचा पुरावा – वीज/पाणी/गॅस/लँडलाईन बिल (जे ३ महिन्यांच्या आतलं), बँक पासबुक किंवा बँक स्टेटमेंट, रेशन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, भाडे करार (नोंदणीकृत), पेन्शन दस्तऐवज, राज्य / केंद्र सरकारनं जारी केलेले रहिवासी प्रमाणपत्र पत्त्याच्या पुराव्यासाठी वापरलं जाऊ शकतं.
जन्म दाखला – शाळेची गुणपत्रिका, पासपोर्ट, पेन्शन कागदपत्र ज्यामध्ये तुमची जन्मतारीख लिहिलेली आहे, जन्मतारीख असलेलं राज्य किंवा केंद्र सरकारचं प्रमाणपत्र वापरता येईल.
नात्याचा पुरावा - हे आवश्यक असल्यासच.
कोणाला लागू होणार नवे नियम?
भारतीय नागरिक
- परदेशात राहणारे भारतीय (एनआरआय)
- ५ वर्षापेक्षा जास्त वयाची मुले
- दीर्घ कालावधीसाठी व्हिसावर भारतात राहणारे परदेशी नागरिक
परदेशी आणि ओसीआय कार्डधारकांना त्यांचा पासपोर्ट, व्हिसा, नागरिकत्व प्रमाणपत्र किंवा एफआरआरओचा रहिवासी परवाना दाखवावा लागेल.