नवी दिल्ली - केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) आर्थिक वर्ष २०१८-२०१९ साठी नवा प्राप्तिकर फॉर्म (आयटीआर) गुरुवारी अधिसूचित केला. हा फॉर्म पगारदार व व्यावसायिकांसाठी बंधनकारक असून, त्यात पगारदारांना वेतनाचा तपशील आणि व्यावसायिकांना त्यांची उलाढाल व वस्तू आणि सेवा कराचा (जीएसटी) क्रमांक द्यावा लागेल.
सीबीडीटीने म्हटले आहे की, नव्या फॉर्ममध्ये काही जागा वेळ वाचण्यासाठी रद्द केल्या असून, फॉर्म भरण्याची पद्धत गेल्या वर्षीसारखीच आहे. सर्व सातही आयटीआर फॉर्म्स इलेक्ट्रॉनिकली भरता येतील. सगळ्यात प्राथमिक आयटीआर-वन किंवा सहज फॉर्म पगारदार करदात्यांना भरावा लागतो. गेल्या आर्थिक वर्षात तीन कोटी करदात्यांनी हा सहज फार्म भरला होता. नव्या फॉर्ममध्ये वेतनाचा तपशील स्वतंत्र जागेत मागितला असून, ज्या भत्त्यांना सूट नाही, ते अवांतर प्राप्तीची रक्कम, वेतनाच्या ऐवजी मिळालेला नफा आणि कलम १६ अंतर्गत दावा केलेल्या वजावटी (डिडक्शन्स) द्याव्या लागतील.
यांनीही भरायला हवा
सीबीडीटीने म्हटले आहे की, आयटीआर-वन फॉर्म ज्या व्यक्तीचे उत्पन्न ५० लाख रुपयांपर्यंत आहे व ते उत्पन्न तिच्या वेतनातून, व्याजातून वा एका घराच्या मालमत्तेतून मिळवित असली, तरी भरावेच लागणार आहे.
सीबीडीटीने दिले नवे आयटीआर फॉर्म
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) आर्थिक वर्ष २०१८-२०१९ साठी नवा प्राप्तिकर फॉर्म (आयटीआर) गुरुवारी अधिसूचित केला. हा फॉर्म पगारदार व व्यावसायिकांसाठी बंधनकारक असून, त्यात पगारदारांना वेतनाचा तपशील आणि व्यावसायिकांना त्यांची उलाढाल व वस्तू आणि सेवा कराचा (जीएसटी) क्रमांक द्यावा लागेल.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 00:38 IST2018-04-07T00:38:27+5:302018-04-07T00:38:27+5:30