Lokmat Money > बिझनेस न्यूज > ऑफिसमध्ये केलेले अफेअर भोवले; २२६५०० कोटी रुपयांच्या कंपनीने CEO ला दाखवला बाहेरचा रस्ता...

ऑफिसमध्ये केलेले अफेअर भोवले; २२६५०० कोटी रुपयांच्या कंपनीने CEO ला दाखवला बाहेरचा रस्ता...

Nestle CEO Laurent Freixe: जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीत घडला प्रकार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 16:13 IST2025-09-02T16:12:51+5:302025-09-02T16:13:42+5:30

Nestle CEO Laurent Freixe: जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीत घडला प्रकार!

Nestle CEO Laurent Freixe: Office affair exposed; Rs 226,500 crore company shows CEO the way out | ऑफिसमध्ये केलेले अफेअर भोवले; २२६५०० कोटी रुपयांच्या कंपनीने CEO ला दाखवला बाहेरचा रस्ता...

ऑफिसमध्ये केलेले अफेअर भोवले; २२६५०० कोटी रुपयांच्या कंपनीने CEO ला दाखवला बाहेरचा रस्ता...

Nestle Ceo love scandal: तुम्हाला कोल्डप्ले म्युझिकल कॉन्सर्टचा 'तो' व्हिडिओ आठवत असेल, ज्यात अ‍ॅस्ट्रोनॉमर कंपनीचे सीईओ आपल्या महिला एचआरसोबत गळ्यात गळे घातलेल्या अवस्थेत दिसले होते. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सीईओ अँडी बायर्न आणि एचआर क्रिस्टिन कॅबोट यांना कंपनी सोडावी लागली. दरम्यान, आता त्यापेक्षाही मोठ्या कंपनीत प्रेमप्रकरणाचे प्रकरण समोर आले आहे. 

प्रेमप्रकरणामुळे सीईओ अडचणीत 
जगातील सर्वात मोठ्या एफएमसीजी कंपन्यांपैकी एक असलेल्या नेस्लेचे सीईओ ऑफिस अफेअरमुळे अडचणीत आले आहेत. याप्रकरणी नेस्लेने सीईओ लॉरेंट फ्रेक्स यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. लॉरेंट फ्रेक्स यांचे ऑफिसमधील ज्युनिअर तरुणीसोबत अफेअर होते. चौकशीत हे उघडकीस आल्यानंतर त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले. 

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, स्विस कंपनी नेस्लेचे सीईओ लॉरेंट फ्रीक्स यांचे सोबत काम करणाऱ्या ज्युनिअर तरुणीशी संबंध होते. ही गोष्ट कंपनीच्या व्यवस्थापनाच्या निदर्शनास आली. या अफेअरची तक्रार मिळाल्यानंतर कंपनीने बाह्य तपास संस्थेकडून प्रकरणाची पुन्हा चौकशी केली. तपासात असे दिसून आले की, फ्रीक्सने या संबंधाबद्दल कंपनीला खोटे बोलले. चौकशीनंतर कंपनीने त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. 

कंपनीसोबत ४० वर्षे
लॉरेंट सुमारे ४० वर्षे कंपनीशी संबंधित होते. सप्टेंबर २०२४ मध्येच त्यांना सीईओची सूत्रे मिळाली होती. त्यांनी युरोप आणि लॅटिन अमेरिकेत नेस्लेचा व्यवसाय वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. कंपनीने आता लॉरेंटच्या जागी फिलिप नवरातिल यांना नेस्लेचे नवे सीईओ म्हणून नियुक्त केले आहे. 

Web Title: Nestle CEO Laurent Freixe: Office affair exposed; Rs 226,500 crore company shows CEO the way out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.