Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > युद्धामुळे शेजारी राष्ट्र होरपळले! पेट्रोल ३१ तर डिझेल ५४ रुपयांनी महागले; LPG २००० रुपये पार

युद्धामुळे शेजारी राष्ट्र होरपळले! पेट्रोल ३१ तर डिझेल ५४ रुपयांनी महागले; LPG २००० रुपये पार

Fuel Crisis in Nepal : भारताचा शेजारील देश असलेल्या नेपाळमध्येही तेल आणि इंधनाचे संकट अधिकच गडद होत आहे. रविवार रात्रीपासून नेपाळमध्ये पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ३१ रुपयांची वाढ करण्यात आली आहे, तर डिझेल प्रति लिटर ५४ रुपयांनी महाग झाले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 11:00 IST2026-03-16T11:00:05+5:302026-03-16T11:00:48+5:30

Fuel Crisis in Nepal : भारताचा शेजारील देश असलेल्या नेपाळमध्येही तेल आणि इंधनाचे संकट अधिकच गडद होत आहे. रविवार रात्रीपासून नेपाळमध्ये पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ३१ रुपयांची वाढ करण्यात आली आहे, तर डिझेल प्रति लिटर ५४ रुपयांनी महाग झाले आहे.

Nepal Fuel Price Hike March 2026: Petrol and Diesel Rates Skyrocket due to Iran-Israel War | युद्धामुळे शेजारी राष्ट्र होरपळले! पेट्रोल ३१ तर डिझेल ५४ रुपयांनी महागले; LPG २००० रुपये पार

युद्धामुळे शेजारी राष्ट्र होरपळले! पेट्रोल ३१ तर डिझेल ५४ रुपयांनी महागले; LPG २००० रुपये पार

Fuel Crisis in Nepal : इराण आणि इस्रायलमधील युद्धाचे चटके आता भारताच्या शेजारील देशाला, म्हणजेच नेपाळला बसू लागले आहेत. वाढत्या जागतिक तणावामुळे निर्माण झालेल्या तेल संकटामुळे नेपाळ सरकारने एका रात्रीत पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरच्या किमतीत प्रचंड वाढ केली आहे. विशेष म्हणजे, नेपाळमध्ये आता डिझेल हे पेट्रोलपेक्षाही महाग विकले जात आहे.

एका झटक्यात दरवाढीचा 'डोस'

नेपाळ ऑइल कॉर्पोरेशनने रविवारी रात्री उशिरापर्यंत घेतलेल्या बैठकीनंतर इंधन दरवाढीचा निर्णय घेतला. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचा तुटवडा निर्माण झाल्याने आणि पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने ही दरवाढ अनिवार्य असल्याचे नेपाळने म्हटले आहे.

नेपाळमधील नवीन दर (प्रति लिटर/सिलिंडर):

पेट्रोल : ३१ रुपयाने महाग (नवा दर: १८८ रुपये)
डिझेल : ५४ रुपयाने महाग (नवा दर: १९६ रुपये)
एलपीजी सिलिंडर : २९६ रुपयाने महाग (नवा दर: २,१२६ रुपये)

इंधनासाठी नेपाळची भारतावर १००% भिस्त

नेपाळमध्ये स्वतःची कोणतीही तेल शुद्धीकरण कारखाना नाही. त्यामुळे आपल्या इंधनाच्या १००% गरजा पूर्ण करण्यासाठी नेपाळ पूर्णपणे भारतावर अवलंबून आहे. नेपाळ ऑइल कॉर्पोरेशनने या कठीण काळातही इंधनाचा पुरवठा सुरळीत ठेवल्याबद्दल भारतीय तेल कंपनी 'इंडियन ऑइल'चे आभार मानले आहेत. "संकटाच्या या काळातही भारताने आमची साथ सोडली नाही," अशा शब्दांत नेपाळने भारताचे ऋण व्यक्त केले आहे.

दरवाढीचे मुख्य कारण काय?

नेपाळ ऑइल कॉर्पोरेशनच्या माहितीनुसार, पश्चिम आशियातील संकटामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. नेपाळ तेल उत्पादन करत नसल्याने जागतिक दरातील वाढीचा थेट परिणाम तिथल्या अर्थव्यवस्थेवर होतो. इंधन खरेदीसाठी कराव्या लागणाऱ्या पेमेंटमध्ये अडचणी येत असल्याने दरवाढ करणे हाच एकमेव पर्याय उरल्याचे नेपाळने स्पष्ट केले आहे.

वाचा - PF व्याजाची प्रतीक्षा संपणार! पीएफवर मिळणार ८.२५% व्याज; तुमच्या खात्यात किती पैसे येणार? पाहा हिशोब

या दरवाढीचा भारतावर काय परिणाम होणार?
नेपाळमध्ये इंधन महाग झाल्यामुळे भारत-नेपाळ सीमेवर इंधनाची तस्करी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. भारतीय सीमेजवळील नेपाळी नागरिक आता स्वस्त इंधनासाठी भारतीय पेट्रोल पंपांवर गर्दी करण्याची शक्यता आहे, ज्यामुळे सीमावर्ती भागातील पुरवठ्यावर ताण येऊ शकतो.
 

Web Title : युद्ध का असर नेपाल पर: ईंधन की कीमतें बढ़ीं, एलपीजी ₹2000 पार

Web Summary : ईरान-इजराइल युद्ध के कारण नेपाल में ईंधन संकट गहराया। पेट्रोल, डीजल और एलपीजी की कीमतें तेजी से बढ़ीं। नेपाल ईंधन के लिए भारत पर निर्भर है, सीमा पर तस्करी का खतरा।

Web Title : War Hits Nepal: Fuel Prices Soar, LPG Crosses ₹2000

Web Summary : Nepal faces fuel crisis due to Iran-Israel war. Petrol, diesel, and LPG prices surged drastically. Nepal relies on India for fuel, with potential border smuggling risks.