Lokmat Money > बिझनेस न्यूज > दिल्लीपेक्षाही मुंबई शहर महाग; जगात कोणते शहर सर्वाधिक महाग? जाणून घ्या

दिल्लीपेक्षाही मुंबई शहर महाग; जगात कोणते शहर सर्वाधिक महाग? जाणून घ्या

महागड्या शहरांच्या यादीत मुंबईने ११ स्थानांची झेप घेतली असली, तरी जगातील टॉप १०० शहरांत मुंबईला स्थान मिळू शकले नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 09:31 AM2024-06-19T09:31:47+5:302024-06-19T09:32:17+5:30

महागड्या शहरांच्या यादीत मुंबईने ११ स्थानांची झेप घेतली असली, तरी जगातील टॉप १०० शहरांत मुंबईला स्थान मिळू शकले नाही.

Mumbai city is more expensive than Delhi Which city is the most expensive in the world | दिल्लीपेक्षाही मुंबई शहर महाग; जगात कोणते शहर सर्वाधिक महाग? जाणून घ्या

दिल्लीपेक्षाही मुंबई शहर महाग; जगात कोणते शहर सर्वाधिक महाग? जाणून घ्या

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : मुंबई हे भारतातील सर्वाधिक महागडे शहर ठरले असून राजधानी दिल्ली दुसऱ्या स्थानी आहे. त्यानंतर चेन्नई, बंगळुरू आणि पुणे या शहरांचा क्रमांक लागला. 

जागतिक पातळीवरील ‘मर्सर’ या संस्थेने जारी केलेल्या ‘२०२४ कॉस्ट ऑफ लिव्हिंग’ नामक सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. मुंबईत पर्सनल केअर, वीज, वाहतूक, घरभाडे आणि इतर आवश्यक बाबींचा खर्च खूप अधिक आहे. महागड्या शहरांच्या यादीत मुंबईने ११ स्थानांची झेप घेतली असली, तरी जगातील टॉप १०० शहरांत मुंबईला स्थान मिळू शकले नाही. जागतिक पातळीवर मुंबई १३६ व्या क्रमांकाचे सर्वाधिक महागडे शहर ठरली आहे. जाहाँगकाँग हे जगातील पहिल्या क्रमांकाचे महागडे शहर आहे.

किमती कुठे अधिक?

भारत
१. मुंबई
२. नवी दिल्ली
३. चेन्नई
४. बंगळुरू
५. हैदराबाद
६. पुणे
७. कोलकाता

जगात
हाँगकाँग
सिंगापूर
झुरिख
जिनेव्हा
बेसल
बर्न
न्यूयॉर्क सिटी
 

Web Title: Mumbai city is more expensive than Delhi Which city is the most expensive in the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.