'हुरुन ग्लोबल रिच लिस्ट २०२६' नुसार जगातील श्रीमंतांची नवीन यादी जाहीर झाली असून, यात भारताने भरारी घेतली आहे. देशातील अब्जाधीशांची संख्या आता ३०८ वर पोहोचली असून, चीन आणि अमेरिकेनंतर भारत जगात तिसऱ्या स्थानावर आहे. जागतिक स्तरावर प्रथमच अब्जाधीशांची संख्या ४,००० च्या पार गेली असून, एकूण ४,०२० अब्जाधीशांची नोंद झाली आहे.
अब्जाधिशांच्या यादीत वाढला भारताचा 'मान' -
रिपोर्टनुसार, यंदा भारतात २४ नवीन अब्जाधीश जोडले गेले आहेत, तर ५७ नवीन व्यक्तींनी पहिल्यांदाच या यादीत स्थान मिळवले आहे. भारतीय अब्जाधीशांची एकूण संपत्ती १० टक्क्यांनी वाढली असून, तब्बल ११२.६ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी ९.८ लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्यांच्या संपत्तीत ९ टक्क्यांची वाढ झाली. तर गौतम अदानी ७.५ लाख कोटींच्या संपत्तीसह दुसऱ्या स्थानावर आहेत. मात्र, त्यांच्या एकूण संपत्तीत १४ टक्के एवढी मोठी घट नोंदवण्यात आली आहे.
अशी आहे भारतातील टॉप-१० श्रीमंतांची यादी -
भारतातील टॉप-१० श्रीमंतांची यादीत, मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यानंतर, रोशनी नादर मल्होत्रा (३.२ लाख कोटी) या पहिल्या १० मध्ये समाविष्ट असणाऱ्या एकमेव महिला आहेत. तर सायरस पूनावाला यांच्या संपत्तीत सर्वाधिक ४४ टक्क्यांची वाढ होऊन ती ३ लाख कोटींवर पोहोचली आहे. कुमार मंगलम बिर्ला (२.५ लाख कोटी), दिलीप संघवी (२.३ लाख कोटी), अझीम प्रेमजी (२.३ लाख कोटी), नीरज बजाज (२.२ लाख कोटी), अशोक हिंदुजा (२.२ लाख कोटी) आणि राधाकिशन दमानी (१.५ लाख कोटी) यांचा समावेश आहे.
अब्जाधीशांच्या यादीत मुंबईची 'शान' -
भारतात ९५ अब्जाधीशांसह मुंबई हे सर्वात श्रीमंत शहर ठरले असून, जागतिक स्तरावर मुंबई सहाव्या क्रमांकावर आहे. तर जागतिक पातळीवर एलन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले असून, त्यांच्या पाठोपाठ जेफ बेझोस आणि लॅरी पेज यांचा क्रमांक लाग
