Lokmat Money > बिझनेस न्यूज > श्रीमंत होण्याची संधी? 'या' अ‍ॅपवर Jio Coin मिळतायेत फ्रीमध्ये; क्रिप्टोकरन्सीसोबत काय आहे कनेक्शन?

श्रीमंत होण्याची संधी? 'या' अ‍ॅपवर Jio Coin मिळतायेत फ्रीमध्ये; क्रिप्टोकरन्सीसोबत काय आहे कनेक्शन?

Free Jio Coin : जर तुम्हाला भविष्यात क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर एक संधी चालून आली आहे. जिओ सध्या फ्रीमध्ये कॉइन वाटत आहे. अद्याप मुकेश अंबानी यांनी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. पण जिओ कॉइन जिओ प्लॅटफॉर्मवर दिसू लागले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 12:46 IST2025-01-24T12:46:20+5:302025-01-24T12:46:51+5:30

Free Jio Coin : जर तुम्हाला भविष्यात क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर एक संधी चालून आली आहे. जिओ सध्या फ्रीमध्ये कॉइन वाटत आहे. अद्याप मुकेश अंबानी यांनी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. पण जिओ कॉइन जिओ प्लॅटफॉर्मवर दिसू लागले आहेत.

mukesh ambani free jio coin you will get free coins if you use jio sphere app check how | श्रीमंत होण्याची संधी? 'या' अ‍ॅपवर Jio Coin मिळतायेत फ्रीमध्ये; क्रिप्टोकरन्सीसोबत काय आहे कनेक्शन?

श्रीमंत होण्याची संधी? 'या' अ‍ॅपवर Jio Coin मिळतायेत फ्रीमध्ये; क्रिप्टोकरन्सीसोबत काय आहे कनेक्शन?

Free Jio Coin : अमेरिकेच्या अध्यक्षपदावर डोनाल्ड ट्रम्प विराजमान झाल्यापासून जगभरात अनेक गोष्टी बदलत आहेत. डॉलर आणखी मजबूत झाला असून रुपया सातत्याने घसरत आहे. दरम्यान, ट्रम्प यांच्या आगमनानंतर क्रिप्टोकरन्सीला सुगीचे दिवस आलेत. बिटकॉईन्सची किंमत तर ८५ लाखांच्या आसपास आहे. तुम्हालाही वाहत्या गंगेत हात धुवून घ्यायचा असेल तर एक नामी संधी चालून आली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी लवकरच क्रिप्टो बाजारात एन्ट्री करण्याची चर्चा आहे. जिओ प्लॅटफॉर्मवर जिओ कॉइन दिसू लागले आहेत. यामुळे या चर्चांना आणखी उधाण आलं आहे. रिपोर्ट्समध्ये असेही म्हटले आहे की Jio Coin पुढील बिटकॉइन होऊ शकते. दरम्यान, कंपनीकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, त्याआधीच तुम्ही फ्रीमध्ये जिओ कॉइन मिळवू शकता.

जिओ कॉइन कसे मिळवायचे?

  • तुम्हालाही फ्रीमध्ये जिओ कॉइन हवे असतील तर सर्वात आधी JioSphere अ‍ॅप डाउनलोड करावे लागेल. अँड्रॉइड युजर्ससाठी गुगल प्ले स्टोअर आणि आयफोन युजर्ससाठी अ‍ॅप स्टोअर पर उपलब्ध आहे.
  • अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तुमचे अकाउंट ओपन करावे लागेल. साइनअप करण्यासाठी तुमचे नाव आणि फोन नंबर लागेल. ओटीपी टाकल्यानंतर तुमच्या नावाची नोंदणी होईल.
  • खाते तयार केल्यानंतर, इंटरनेट सर्व्हिंगसाठी JioSphere ब्राउझर वापरा.
  • तुम्ही अ‍ॅप ब्राउझर वापरण्यास सुरुवात करताच, तुम्हाला हळूहळू रिवॉर्ड्स म्हणून जिओ कॉइन्स मिळू लागतील. तुम्हाला मोफत मिळालेली जिओ कॉइन अ‍ॅपमध्ये दिलेल्या पॉलीगॉन वॉलेटमध्ये जमा होतील.

जिओ कॉइन खरच क्रिप्टो बाजारात येणार?
सध्या तरी कंपनीकडून याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मात्र, भविष्यातील क्रिप्टोकरन्सचे मार्केट पाहता जिओ कॉइन बाजारात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीत अमेरिकेत क्रिप्टो कॅपिटल बनवणार असल्याचे आश्वासन दिले होते. याशिवाय ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया यांनी स्वतःचे वेगवेगळे क्रिप्टो कॉइन लाँच केले आहेत. त्यामुळे भविष्यात जिओ कॉइन बाजारात आले तर आश्चर्य वाटायला नको.

क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय?
क्रिप्टोकरन्सीला डिजिटल चलन किंवा आभासी चलन म्हणतात. याचा वापर वस्तू आणि सेवा खरेदी करण्यासाठी केला जातो. क्रिप्टोकरन्सीला क्रिप्टो-चलन किंवा क्रिप्टो असेही म्हणतात. मात्र, आपल्या रुपयांप्रमाणे हे चलन तुम्ही कुठल्याही एटीएममधून काढू शकत नाही. हे फक्त डिजिटल व्यवहारांमध्येच वापरले जाते. 
 

Web Title: mukesh ambani free jio coin you will get free coins if you use jio sphere app check how

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.