Lokmat Money > बिझनेस न्यूज > MTNL Loan Defaults: कर्जात बुडालीये 'ही' सरकारी कंपनी; बँकांना परत करू शकत नाहीये ८५८५ कोटींचं लोन, जाणून घ्या

MTNL Loan Defaults: कर्जात बुडालीये 'ही' सरकारी कंपनी; बँकांना परत करू शकत नाहीये ८५८५ कोटींचं लोन, जाणून घ्या

MTNL Loan Defaults: कंपनीनं म्हटलंय की त्यांना सात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून घेतलेलं ८,५८५ कोटी रुपयांचं कर्ज आणि त्यावरील व्याज देता आलेलं नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 15:50 IST2025-07-16T15:47:33+5:302025-07-16T15:50:39+5:30

MTNL Loan Defaults: कंपनीनं म्हटलंय की त्यांना सात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून घेतलेलं ८,५८५ कोटी रुपयांचं कर्ज आणि त्यावरील व्याज देता आलेलं नाही.

MTNL Defaults government company is drowning in debt cannot repay loans worth Rs 8585 crore to banks know this | MTNL Loan Defaults: कर्जात बुडालीये 'ही' सरकारी कंपनी; बँकांना परत करू शकत नाहीये ८५८५ कोटींचं लोन, जाणून घ्या

MTNL Loan Defaults: कर्जात बुडालीये 'ही' सरकारी कंपनी; बँकांना परत करू शकत नाहीये ८५८५ कोटींचं लोन, जाणून घ्या

MTNL Loan Defaults: सरकारी दूरसंचार कंपनी महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल) कर्जात बुडाली आहे. कंपनीने तिच्या नियामक फाइलिंगमध्ये म्हटले आहे की ती सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. कंपनीनं म्हटलंय की त्यांना सात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून घेतलेलं ८,५८५ कोटी रुपयांचं कर्ज आणि त्यावरील व्याज देता आलेलं नाही.

मंगळवारी एका नियामक फाइलिंगमध्ये एमटीएनएलनं म्हटलं की त्यांनी काही मोठ्या सरकारी बँकांकडून कर्ज घेतलंय. आता ते व्याजासह संपूर्ण रक्कम परत करण्यात अपयशी ठरले आहेत. या खुलाशाचा परिणाम एमटीएनएलच्या शेअर्सवर दिसून आला. मंगळवारी एमटीएनएलचे शेअर्स ४.८० टक्क्यांनी घसरून ४९.५९ रुपयांवर बंद झाले, जे मागील सत्रापेक्षा २.५० रुपये कमी आहे.

Post Office नं या स्कीमच्या व्याजदरात केली कपात, पाहा आता किती मिळणार रिटर्न

कोणत्या बँकांचं लोन?

या लिस्टमध्ये युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, युको बँक, पंजाब अँड सिंध बँक आणि इंडियन ओव्हरसीज बँक यांचा समावेश आहे. ऑगस्ट २०२४ ते फेब्रुवारी २०२५ दरम्यान कंपनी डिफॉल्ट झाल्यंच एमटीएनएलनं म्हटलंय. एकूण थकबाकीमध्ये ७,७९४.३४ कोटी रुपयांचे मुद्दल आणि ७९०.५९ कोटी रुपयांचे व्याज समाविष्ट आहे.

या बँकांकडून घेतलंय सर्वाधिक कर्ज

यापैकी, युनियन बँक ऑफ इंडियाकडे सर्वाधिक ३,७३३.२२ कोटी रुपये थकबाकी आहे, त्यानंतर इंडियन ओव्हरसीज बँक २,४३४.१३ कोटी रुपयांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. एमटीएनएलवर मोठ्या प्रमाणात कर्ज आहे. त्यावर एकूण ३४,४८४ कोटी रुपयांचे कर्ज आहे. यामध्ये ८,५८५ कोटी रुपयांचे कर्ज, २४,०७१ कोटी रुपयांचे सॉवरेन गॅरेंटी बाँड आणि त्यावरील व्याज भरण्यासाठी दूरसंचार विभागाकडून घेतलेले १,८२८ कोटी रुपयांचं कर्ज यांचा समावेश आहे.

सरकारने यापूर्वी कंपनीला आर्थिक मदत दिली आहे, परंतु कंपनीवरील कर्जाचा बोजा ज्या पद्धतीने वाढत आहे ते पाहता, तिच्या वसुलीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Web Title: MTNL Defaults government company is drowning in debt cannot repay loans worth Rs 8585 crore to banks know this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.