मदर डेअरीचं दूध महाग झालं आहे. कंपनीनं दुधाच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हा बदल बुधवार, ३० एप्रिल २०२५ म्हणजेच आजपासून पासून लागू होणार आहे. दूध खरेदीचा खर्च वाढल्यानं हे पाऊल उचलावं लागल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. उन्हाळा आणि उष्णतेच्या लाटेचा परिणाम दूध उत्पादनावर झालाय. यामुळे शेतकऱ्यांकडून दूध खरेदीच्या दरात वाढ झाली आहे. शेतकरी आणि ग्राहक या दोघांचंही हित लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचं मदर डेअरीचे म्हणणं आहे.
मदर डेअरीनं आजपासून दुधाच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ केली. गेल्या काही महिन्यांत दूध खरेदीच्या खर्चात प्रतिलिटर चार ते पाच रुपयांनी वाढ झाल्यानं हा बदल करण्यात आला आहे. उन्हाळ्याची सुरुवात आणि उष्णतेची लाट यामुळे दुधाच्या दरात वाढ झाली आहे.
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
'या' राज्यांना बसणार फटका
शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाला आधार देताना ग्राहकांना चांगल्या दर्जाचं दूध उपलब्ध देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. हा बदल वाढीव खर्चाचा केवळ अर्धा भाग आहे. शेतकरी आणि ग्राहक या दोघांचंही हित साधणं हे आपलं उद्दिष्ट आहे, असं कंपनीच्या प्रवक्त्यानं सांगितलं. दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश, हरयाणा आणि उत्तराखंडच्या बाजारपेठांसाठी हे नवे दर ३० एप्रिल २०२५ पासून लागू होतील.