Lokmat Money > बिझनेस न्यूज > महिन्याकाठी खर्च वाढला, बचतीचे काय? १५:६५:२०चा फॉर्म्युला मिटवेल सर्व चिंता

महिन्याकाठी खर्च वाढला, बचतीचे काय? १५:६५:२०चा फॉर्म्युला मिटवेल सर्व चिंता

उरलेली २० टक्के रक्कम तुमच्या आवडीनिवडी, फिरणे, हॉटेलात जाणे, सिनेमा आवडत्या वस्तूंच्या खरेदीसाठी राखून ठेवा. या खर्चात तुम्ही कपातही करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 11:01 IST2025-05-02T11:00:54+5:302025-05-02T11:01:39+5:30

उरलेली २० टक्के रक्कम तुमच्या आवडीनिवडी, फिरणे, हॉटेलात जाणे, सिनेमा आवडत्या वस्तूंच्या खरेदीसाठी राखून ठेवा. या खर्चात तुम्ही कपातही करू शकता.

Monthly expenses have increased, what about savings? The 15:65:20 formula will solve all worries | महिन्याकाठी खर्च वाढला, बचतीचे काय? १५:६५:२०चा फॉर्म्युला मिटवेल सर्व चिंता

महिन्याकाठी खर्च वाढला, बचतीचे काय? १५:६५:२०चा फॉर्म्युला मिटवेल सर्व चिंता

महिन्याकाठी मिळणाऱ्या वेतनातून महत्त्वाचे घरखर्च भागवून काही पैसे भविष्यासाठी बाजूला काढून ठेवणे अनेकांना जमत नाही. हे नियोजन करताना अनेकजण गोंधळून जातात. तुम्हीही या विवंचनेत असाल तर १५:६५:२० हा फॉर्म्युला एकदा वापरून पाहा. यामुळे तुमचे सर्व नियोजन सोपे होईल याची खात्री बाळगा.

वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज

याचा अर्थही अगदी सोपा आहे. आलेल्या पगारातील सर्वाधिक ६५ टक्के इतका भाग आवश्यक खर्चासाठी वेगळा काढून ठेवा. यात किराणामाल, प्रवास खर्च, विजेचे बिल, मुलांचा शिक्षणाचा खर्च, रिचार्ज आदींचा समावेश होतो. हा खर्च टाळता येत नाही किंवा कमी करता येत नाही.

उरलेली २० टक्के रक्कम तुमच्या आवडीनिवडी, फिरणे, हॉटेलात जाणे, सिनेमा आवडत्या वस्तूंच्या खरेदीसाठी राखून ठेवा. या खर्चात तुम्ही कपातही करू शकता. इतर १५ टक्के रक्कम मात्र इतर सर्व प्रकारचे खर्च टाळून कोणत्याही सुरक्षित पर्यायात गुंतवा. गुंतवणुकीसाठी बँक मुदत ठेव, पोस्टात ठेव, म्युच्युअल फंड किंवा अन्य बचत योजनांचा समावेश असतो. ही रक्कम न चुकता दर महिन्याला बाजूला काढून ठेवा.

Web Title: Monthly expenses have increased, what about savings? The 15:65:20 formula will solve all worries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक