Lokmat Money > बिझनेस न्यूज > आठवड्यातून फक्त २ दिवस काम करावे लागणार? बिल गेट्स यांचं मोठं भाकीत, म्हणाले AI..

आठवड्यातून फक्त २ दिवस काम करावे लागणार? बिल गेट्स यांचं मोठं भाकीत, म्हणाले AI..

microsoft cofounder bill gates : मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स नेहमी काळाच्या पुढचे विचार मांडत असतात. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात एआयवरुन मोठं भाकीत केलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 15:53 IST2025-04-02T15:27:26+5:302025-04-02T15:53:59+5:30

microsoft cofounder bill gates : मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स नेहमी काळाच्या पुढचे विचार मांडत असतात. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात एआयवरुन मोठं भाकीत केलं आहे.

microsoft cofounder bill gates two day work week prediction ai to replace humans | आठवड्यातून फक्त २ दिवस काम करावे लागणार? बिल गेट्स यांचं मोठं भाकीत, म्हणाले AI..

आठवड्यातून फक्त २ दिवस काम करावे लागणार? बिल गेट्स यांचं मोठं भाकीत, म्हणाले AI..

microsoft cofounder bill gates : कामाचे तास किती असावेत? यावरुन भारतात वाकयुद्ध पेटलं आहे. इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी तरुणांना आठवड्यात ७० तास काम करण्याचा सल्ला दिला होता. तेव्हापासून वर्क लाईफ बॅलन्स कायम चर्चेत येत आहे. आतापर्यंत अनेक बडे उद्योगपती आणि व्यावसायिकांनी यावर आपले मत व्यक्त केलं आहे. मात्र, मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी याबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. येत्या १० वर्षांत लोकांना आठवड्यातून फक्त २ दिवस काम करावे लागेल, असा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या या भविष्याने अनेकांच्या मनात चिंता निर्माण झाली आहे. बिल गेट्स हे काळाची दिशा ओळखणारे उद्योजक मानले जातात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी एआयच्या मदतीने शेती करणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्याची भेट घेतली होती. याच एआयवरुन त्यांनी हे मत व्यक्त केलं आहे.

बिल गेट्स यांचा इशारा कोणाला?
बिल गेट्स यांच्या मते, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आपल्या बहुतेक नोकऱ्या खाणार आहे. परिणामी प्रत्यक्ष काम करण्याची गरज लक्षणीयरीत्या कमी होईल. यासोबतच लोकांची काम करण्याची पद्धतही पूर्णपणे बदलेल. गेट्स नेहमी काळाच्या पुढचा विचार करुन लोकांना अचंबित करतात. त्यांच्या या भविष्यवाणीने उत्पादकता, रोजगार आणि लोकांच्या दैनंदिन जीवनात AI च्या भूमिकेवरुन एक नवीन वाद निर्माण केला आहे. अशा परिस्थितीत एआय लोकांच्या नोकऱ्यांची जागा घेणार का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आठवड्यातून किती तास काम करावे?
बिल गेट्स म्हणाले की २०२२ मध्ये OpenAI द्वारे ChatGPT लाँच केल्यानंतर, AI ने लोकांची विचारसरणी आणि त्यांचे कार्य बदलले आहे. आज, जेमिनी, ग्रोक आणि डीपसीक सारखे AI चॅटबॉट्स अधिकाधिक वापरले जात आहेत. अनेक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांमध्ये नोकरी जाण्याची भिती निर्माण झाली आहे. पण, एआय काही क्षेत्रांमध्ये लोकांपेक्षा चांगली कामगिरी करू शकतो, असा विश्वास बिल गेट्स यांना वाटतो. वास्तविक, आठवड्यातून काही दिवस काम करण्याची त्यांची कल्पना नवीन नाही. २०२३ मध्ये, जेव्हा AI टूल ChatGPT लोकप्रिय झाले, तेव्हा त्यांनी सल्ला दिला होता की लोक आठवड्यातून ३ दिवस कमी शिफ्ट करू शकतात.

वाचा  - गुजरात नाही तर 'हे' राज्य आहे देशात सर्वात श्रीमंत; एकट्याचा GDP मध्ये १३% पेक्षा जास्त वाटा

एआयमुळे नोकऱ्या धोक्यात येणार?
आता AI वेगाने विकसित होत असताना त्यांनी पुन्हा एकदा एक भाकीत केलं आहे. लवकरच AI नियमित कामे करताना दिसेल, जसे की कारखाने, वाहतूक आणि अन्न उत्पादन, जेथे लोकांची गरज कमी होईल. गेट्स नेहमी म्हणाले की एआयमध्ये उद्योग बदलण्याची क्षमता आहे. दुसरीकडे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) मुळे नोकऱ्यांना किती धोका आहे, हे सांगणे कठीण आहे. मात्र, काही तज्ज्ञांच्या मते, एआयमुळे अनेक नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात.
 

Web Title: microsoft cofounder bill gates two day work week prediction ai to replace humans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.