Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > मेमध्ये पोलाद आयात ५८ टक्क्यांनी वाढली

मेमध्ये पोलाद आयात ५८ टक्क्यांनी वाढली

भारताची पोलाद आयात मे महिन्यात ५८ टक्क्यांनी वाढून १० लाख टन झाली आहे. यावरून देशी उत्पादकांसाठी कठीण दिवस असल्याचे दिसते.

By admin | Updated: June 8, 2015 23:35 IST2015-06-08T23:35:03+5:302015-06-08T23:35:03+5:30

भारताची पोलाद आयात मे महिन्यात ५८ टक्क्यांनी वाढून १० लाख टन झाली आहे. यावरून देशी उत्पादकांसाठी कठीण दिवस असल्याचे दिसते.

In May, steel imports increased by 58% | मेमध्ये पोलाद आयात ५८ टक्क्यांनी वाढली

मेमध्ये पोलाद आयात ५८ टक्क्यांनी वाढली

नवी दिल्ली : भारताची पोलाद आयात मे महिन्यात ५८ टक्क्यांनी वाढून १० लाख टन झाली आहे. यावरून देशी उत्पादकांसाठी कठीण दिवस असल्याचे दिसते आणि त्यांच्यावर किंमत तसेच कोरिया आणि चीनकडून होणाऱ्या स्वस्त आयातीचे दडपण आहे. दुसरीकडे पोलादाचा खप वर्षाच्या आधारावर गेल्या महिन्यात ६.८ टक्के वाढून ७२.३४ लाख टन झाल्यामुळे उद्योगासाठी आशेचा किरणही आहे.
पोलाद मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या संयुक्त सयंत्र समितीने दिलेल्या आकडेवारीनुसार मे २०१५ मध्ये पोलादाची आयात ५८ टक्क्यांनी वाढून ९.१ लाख टन झाली. एप्रिलमध्ये २०.४ टक्क्यांची वाढ नोंदली गेली होती. आर्थिक वर्ष २०१५-२०१६ च्या पहिल्या दोन महिन्यांत भारत पोलादाचा निव्वळ आयात देश बनला होता. एप्रिल-मेमध्ये २०१४-२०१५ दरम्यान भारताची पोलाद आयात ५४.५ टक्के (१६.७ लाख टन) होती. २०१३-२०१४ च्या तुलनेत २०१४-२०१५ मध्ये आयात ७१ टक्के वाढून ९३.२ लाख टन झाली. रेटिंग एजन्सी मुडीजनुसार मार्च २०१६ मध्ये समाप्त होणाऱ्या चालू आर्थिक वर्षात पोलादाची आयात कमी होण्याची शक्यता नाही.
गेल्या आठवड्यात भारताने चीनसह तीन देशांकडून होणाऱ्या काही पोलाद उत्पादनांवर शुल्क आकारले होते त्यामुळे देशी उत्पादकांना काही प्रमाणात संरक्षण मिळेल. या उपाययोजनेमुळे वाढत्या आयातीला कमी करता येईल अशी आशा आहे. पोलादाच्या खपात हळूहळू वाढ होत असल्यामुळे देशी उत्पादकांचा महसूल आणि नफ्यात वाढ होण्याची अपेक्षा आहे. मे २०१५ मध्ये भारतात उत्पादन झालेल्या पोलादाचा एकूण खप वार्षिक आधारावर ६.८ टक्के वाढून ७२.३४ लाख टन झाला. तो एप्रिल २०१५ च्या तुलनेत ३१.३ टक्के जास्त आहे.

Web Title: In May, steel imports increased by 58%