मुंबई : मसाला किंग डॉ. धनंजय दातार यांच्या अल अदील सुपर स्टोअर्स साखळीने विस्ताराचा सुवर्णमहोत्सवी टप्पा गाठला असून, दातार यांच्या हस्ते ५० व्या अल अदील सुपर स्टोअरचे उद्घाटन नुकतेच दुबईत झाले. अल अदील समूहाचे अन्य संचालक सौ. वंदना दातार, हृषीकेश दातार व रोहित दातार यावेळी उपस्थित होते.
जुमैरा व्हिलेज सर्कल परिसरातील रिव्हेरा अपार्टमेंटमध्ये हे प्रशस्त स्टोअर आहे.यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना डॉ. दातार म्हणाले, ‘आमच्या ५० व्या अल अदील सुपर स्टोअरचे उद्घाटन करताना मनात जुन्या आठवणी दाटल्या. १९८४ मध्ये माझे वडील (कै) महादेवराव दातार यांनी प्रामुख्याने दुबईतील भारतीय समुदायाला त्यांच्या पसंतीची अस्सल भारतीय खाद्य उत्पादने मिळावीत या हेतूने भाड्याच्या जागेत छोटे किराणा मालाचे दुकान सुरू केले. मी वयाच्या विशीत त्यांना मदत करण्यास त्याच वर्षी दुबईत आलो.”
९ हजार उत्पादने
डॉ. धनंजय दातार यांच्या नेतृत्वाखाली ‘अल अदील ट्रेडिंग’ने ९००० भारतीय उत्पादने संयुक्त अरब अमिरातीत (यूएई) आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असून, स्वतःच्या ‘पिकॉक’ या ब्रँडअंतर्गत तयार पिठे, मसाले, लोणची, मुरंबे, नमकीन, इन्स्टंट अशा श्रेणींत ७००हून अधिक उत्पादने ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहेत.
दातार यांच्या उद्योगाची भारतीय शाखा ‘मसाला किंग एक्स्पोर्ट्स’ या नावाने मुंबईत कार्यरत आहे.
अल अदील स्टोअर्सचा सुवर्णमहोत्सवी टप्पा; दुबईत ५० व्या सुपर स्टोअरचे उद्घाटन
मसाला किंग डॉ. धनंजय दातार यांच्या अल अदील सुपर स्टोअर्स साखळीने विस्ताराचा सुवर्णमहोत्सवी टप्पा गाठला असून, दातार यांच्या हस्ते ५० व्या अल अदील सुपर स्टोअरचे उद्घाटन नुकतेच दुबईत झाले.
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2021 06:33 IST2021-10-21T06:33:08+5:302021-10-21T06:33:20+5:30
मसाला किंग डॉ. धनंजय दातार यांच्या अल अदील सुपर स्टोअर्स साखळीने विस्ताराचा सुवर्णमहोत्सवी टप्पा गाठला असून, दातार यांच्या हस्ते ५० व्या अल अदील सुपर स्टोअरचे उद्घाटन नुकतेच दुबईत झाले.
