Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Maruti ला गाड्यांची ऑर्डरच पूर्ण करता येईना, २ लाखांचं वेटिंग; आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत कंपनी

Maruti ला गाड्यांची ऑर्डरच पूर्ण करता येईना, २ लाखांचं वेटिंग; आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत कंपनी

Maruti Suzuki Cars: देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी आपली पूर्ण क्षमता वापरूनही ग्राहकांच्या ऑर्डर्स पूर्ण करू शकत नसल्याची माहिती समोर आलीये. पाहा काय म्हटलंय कंपनीनं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 15:37 IST2026-03-04T15:36:35+5:302026-03-04T15:37:39+5:30

Maruti Suzuki Cars: देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी आपली पूर्ण क्षमता वापरूनही ग्राहकांच्या ऑर्डर्स पूर्ण करू शकत नसल्याची माहिती समोर आलीये. पाहा काय म्हटलंय कंपनीनं.

Maruti suzuki is unable to fulfill car orders waiting for 2 lakhs Now the company is preparing to take a big decision expanding capacity | Maruti ला गाड्यांची ऑर्डरच पूर्ण करता येईना, २ लाखांचं वेटिंग; आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत कंपनी

Maruti ला गाड्यांची ऑर्डरच पूर्ण करता येईना, २ लाखांचं वेटिंग; आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत कंपनी

Maruti Suzuki Cars: देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी आपली पूर्ण क्षमता वापरूनही ग्राहकांच्या ऑर्डर्स पूर्ण करू शकत नसल्याची माहिती समोर आलीये. कंपनीकडे सध्या सुमारे २,००,००० गाड्यांची ऑर्डर पेंडिंग आहे. देशांतर्गत वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी कंपनीने आता पुढील आर्थिक वर्षात आपली उत्पादन क्षमता ५,००,००० युनिट्सनी वाढवण्याची योजना आखली आहे. सध्या कंपनीच्या हरियाणा आणि गुजरात प्लांटची वार्षिक क्षमता २६ लाख युनिट्सची आहे.

ईटीच्या रिपोर्टनुसार, मारुती सुझुकीनं म्हटलंय की मागणी पूर्ण करण्यासाठी त्यांचे प्लांट्स पूर्ण क्षमतेनं काम करत आहेत. कंपनीकडे सध्या केवळ १२ दिवसांची 'डीलर इन्व्हेंटरी' उपलब्ध आहे, ज्यामध्ये सात दिवसांच्या ट्रान्झिटचाही समावेश आहे. हे ३० दिवसांच्या सामान्य डीलर इन्व्हेंटरीच्या तुलनेत निम्म्याहून कमी आहे. "गेल्या काळात कंपनीच्या बुकिंगमध्ये २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. आमची क्षमता इतकी जास्त नाही, तरीही कोणालाही गाडीसाठी जास्त वेळ थांबावं लागू नये, यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत," अशी प्रतिक्रिया कंपनीचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी (मार्केटिंग आणि सेल्स) पार्थो बॅनर्जी यांनी दिली.

दक्षिण कोरियाच्या शेअर बाजारात हाहाकार, लागलं सर्किट ब्रेकर; चलन १७ वर्षांच्या नीचांकी स्तरावर

कंपनी किती गाड्या बनवते?

कंपनीनं गेल्या महिन्यात १,६१,००० कार्स डिस्पॅच केल्या, तर गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये हा आकडा १,६०,७९१ होता. सुझुकी मोटरनं गेल्या महिन्यात 'पोस्ट-अर्निग्स कॉल'मध्ये माहिती दिली होती की, कंपनी दरमहा २,२०,००० ते २,३०,००० गाड्यांचं उत्पादन करत आहे. यापैकी १,७०,००० ते १,८०,००० युनिट्स देशांतर्गत विक्रीसाठी आहेत, तर ५०,००० गाड्यांची निर्यात केली जात आहे.

उत्पादन क्षमता वाढवणार

कंपनी आफ्रिका आणि पश्चिम आशियातील देशांना निर्यात करते. पुढील आर्थिक वर्षात दोन नवीन प्लांट्समधून उत्पादन सुरू झाल्यावर दरमहा २०,००० अतिरिक्त गाड्यांची निर्यात होईल. सुझुकीच्या जागतिक विक्रीमध्ये मारुतीचा वाटा ५६ टक्के आहे. पुढील वर्षी भारतात प्रत्येकी २,५०,००० युनिट्स क्षमतेच्या दोन नवीन प्लांट्समधून उत्पादन सुरू होणार असल्याचं कंपनीनं म्हटलंय.

हरियाणातील खरखौदा येथील 'सेकंड लाईन'मधून पहिल्या तिमाहीत उत्पादन सुरू होईल, तर गुजरातच्या हंसलपूर येथील 'चौथी लाईन' दुसऱ्या तिमाहीत कार्यान्वित होईल. वेटिंग पिरीयड जास्त असल्यास ग्राहक इतर कंपन्यांकडे वळू शकतात, असं कंपनीचं म्हणणं आहे.

Web Title : मारुति को ऑर्डर पूरा करने में दिक्कत, 2 लाख वेटिंग, विस्तार योजना।

Web Summary : मारुति सुजुकी को पूरी क्षमता के बावजूद 2 लाख ऑर्डर पूरे करने में दिक्कत हो रही है। मांग को पूरा करने के लिए कंपनी अगले वित्त वर्ष में 5 लाख यूनिट उत्पादन बढ़ाने की योजना बना रही है, दो नए प्लांट जुड़ेंगे।

Web Title : Maruti struggles with orders, 2 lakh waiting; expansion planned.

Web Summary : Maruti Suzuki faces 2 lakh pending orders despite full capacity. To meet demand, the company plans to increase production by 5 lakh units next fiscal year, adding two new plants.