Maithili Thakur Net Worth : आपल्या जादुई आवाजाच्या जोरावर स्टार बनलेली अवघी २५ वर्षांची गायिका मैथिली ठाकूर सध्या खूप चर्चेत आहे. मात्र, यावेळी ती आपल्या गाण्यामुळे नाही तर बिहार विधानसभा निवडणुकीमुळे चर्चेत आहे. मूळची बिहारची असलेली मैथिली ठाकूर विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे. नुकतीच तिने भाजपच्या विधानसभा निवडणूक प्रभारी आणि केंद्रीय मंत्र्यांशी भेट घेतली आहे. मात्र, अद्याप तिची जागा किंवा तिकीट निश्चित झालेले नाही. विशेष म्हणजे, एका अत्यंत साधारण कुटुंबातून आलेली मैथिली ठाकूर आज कोट्यवधी रुपयांची मालकीण बनली आहे.
एका शोमधून लाखो रुपयांचे मानधन
मैथिली ठाकूर आज संगीत क्षेत्रात एक मोठे नाव बनली आहे, तेही अगदी कमी वयात. 'द राइजिंग स्टार' या रिअॅलिटी शोमधून तिला ओळख मिळाली. त्यानंतर सोशल मीडियावर स्वतःच्या आवाजातील गाणी टाकण्यास तिने सुरुवात केली आणि तिच्या सुमधुर आवाजामुळे ती अल्पावधीतच सोशल मीडिया स्टार बनली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सध्या मैथिली एका शोसाठी ५ ते ७ लाख रुपये इतके मानधन घेते. ती महिन्यात १२ ते १५ शो करते. याचा अर्थ तिचे मासिक उत्पन्न ९० लाख ते १ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. अशा प्रकारे, ती सध्या कोट्यवधी रुपयांची मालकीण बनली आहे.
यूट्यूब आणि सोशल मीडियातून मोठी कमाई
मैथिलीला सध्या सोशल मीडियातूनही मोठी कमाई होत आहे. 'द राइजिंग स्टार'मधून ओळख मिळाल्यानंतर तिने युट्युब आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तिचे व्हिडिओ टाकायला सुरुवात केली. या व्हिडिओंना लाखो-करोडो व्ह्यूज मिळत असल्याने, त्यातूनही तिला चांगले उत्पन्न मिळत आहे.
जो लोग बिहार के लिए बड़े सपने देखते हैं, उनके साथ हर बातचीत मुझे दूरदृष्टि और सेवा की शक्ति की याद दिलाती है। हृदय से सम्मानित और आभारी हूँ। 🙏✨
— Maithili Thakur (@maithilithakur) October 5, 2025
श्री नित्यानंद राय जी एवं श्री विनोद श्रीधर तावड़े जी 🙏 https://t.co/o6PBAVJaEJ
वाचा - पाकिस्तानातील सोने-चांदीचे दर वाचून विश्वास नाही बसणार! काय आहे एका तोळ्याची किंमत?
राजकीय भूमिकेमुळे चर्चेत
मैथिली ठाकुर लवकरच राजकारणात प्रवेश करू शकते, अशा चर्चांना उधाण आले आहे. माध्यमांशी बोलताना तिने आपल्या गावामधून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळेल, असे तिने नमूद केले होते.
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी झालेल्या भेटीमुळे तिला तिकीट मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे, परंतु भाजपकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.