Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत

LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत

LPG Price 1 October: ऑक्टोबर २०२५ ची सुरुवात झाली आहे आणि ती अनेक मोठ्या बदलांसह (झाली आहे. महिन्याच्या पहिल्याच तारखेला महागाईचा मोठा झटका बसला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 08:15 IST2025-10-01T08:14:46+5:302025-10-01T08:15:52+5:30

LPG Price 1 October: ऑक्टोबर २०२५ ची सुरुवात झाली आहे आणि ती अनेक मोठ्या बदलांसह (झाली आहे. महिन्याच्या पहिल्याच तारखेला महागाईचा मोठा झटका बसला आहे.

LPG Price 1 October LPG cylinder price hiked big shock before Dussehra Price increased by this much from Delhi to Mumbai | LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत

LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत

LPG Price 1 October: ऑक्टोबर २०२५ ची सुरुवात झाली आहे आणि ती अनेक मोठ्या बदलांसह (1st October Rule Change) झाली आहे. महिन्याच्या पहिल्याच तारखेला महागाईचा मोठा झटका बसला आहे. देशात एलपीजी सिलिंडरच्या किमती १६ रुपयांपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत (LPG Cylinder Price Hike). ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी दिल्ली ते मुंबई आणि कोलकाता ते चेन्नई पर्यंत एलपीजी सिलिंडरचे दर वाढवलेत. मात्र, ही वाढ १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत करण्यात आली आहे, तर १४ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

दिल्लीत १५, तर मुंबई-चेन्नईमध्ये १६ रुपयांनी महाग

आयओसीएलच्या वेबसाइटवर अपडेट केलेल्या एलपीजी सिलिंडरच्या किमतींवर नजर टाकल्यास, राजधानी दिल्लीत सिलिंडरच्या किमतीत १५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या बदलानंतर, १९ किलोचा सिलिंडर आता पूर्वीच्या १५८० रुपयांऐवजी १५९५ रुपयांना मिळेल. कोलकात्याबद्दल बोलायचं झाल्यास, व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत १६८४ रुपयांवरून १७०० रुपये झाली आहे.

इतर महानगरांबद्दल बोलायचं झाल्यास, मुंबईत आतापर्यंत १५३१ रुपयांना मिळणारा १९ किलोचा सिलिंडर आता १५४७ रुपयांना, तर चेन्नईमध्ये सिलिंडरटे दर १७३८ रुपयांवरून १७५४ रुपये करण्यात आलेत. दिल्ली वगळता या तिन्ही शहरांमध्ये त्याची किंमत १६ रुपयांनी वाढली आहे. हे नवीन दर १ ऑक्टोबर २०२५ पासून लागू करण्यात आले आहेत.

सतत कमी होत होते सिलिंडरचे दर

यापूर्वी, गेल्या काही महिन्यांपासून व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत सातत्यानं कपात दिसून येत होती. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती ऑइल मार्केटिंग कंपन्यांकडून ५१.५० रुपयांनी कमी करण्यात आल्या होत्या. त्यापूर्वी १ ऑगस्ट रोजी ते ३३.५० रुपयांनी स्वस्त झाले होते. जुलै २०२५ च्या पहिल्या तारखेलाही १९ किलोच्या सिलिंडरचा दर ५८ रुपयांपर्यंत कमी झाला होता.

घरगुती सिलिंडरच्या किमतीत बदल नाही

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत सातत्यानं कपात केल्यानंतर यावेळी कंपन्यांनी वाढ केली असली तरी, १४ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही, म्हणजेच त्यांच्या किमती बदलल्या नाहीत. शेवटच्या वेळी या १४ किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत ८ एप्रिल रोजी बदलली होती, पण त्यानंतर दिल्लीत ती ८५३ रुपये, कोलकातामध्ये ८७९ रुपये, मुंबईत ८५२.५० रुपये आणि चेन्नईमध्ये ८६८.५० रुपयांना मिळत आहे.

Web Title : एलपीजी की कीमतें बढ़ी: दशहरा से पहले व्यावसायिक सिलेंडर महंगा।

Web Summary : 1 अक्टूबर को व्यावसायिक एलपीजी सिलेंडर की कीमतों में ₹16 तक की बढ़ोतरी हुई। दिल्ली में ₹15, मुंबई और चेन्नई में ₹16 की वृद्धि हुई। घरेलू सिलेंडर की कीमतों में कोई बदलाव नहीं।

Web Title : LPG Price Hike: Commercial cylinders get costlier ahead of Dussehra.

Web Summary : Commercial LPG cylinder prices increased up to ₹16 on October 1st. Delhi saw a ₹15 hike, Mumbai and Chennai ₹16. Domestic cylinder prices remain unchanged.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.