lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > LPG Gas Cylinder : अ‍ॅड्रेस प्रूफशिवाय खरेदी करु शकता गॅस सिलिंडर; जाणून घ्या, कसा अर्ज करायचा? 

LPG Gas Cylinder : अ‍ॅड्रेस प्रूफशिवाय खरेदी करु शकता गॅस सिलिंडर; जाणून घ्या, कसा अर्ज करायचा? 

LPG Gas Cylinder : काही दिवसांपूर्वी असा नियम होता की, केवळ अ‍ॅड्रेस प्रूफ असलेले लोकच एलपीजी सिलिंडर घेऊ शकतात, परंतु आता देशातील सरकारी तेल कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने (IOCL) सामान्य लोकांना दिलासा दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 03:04 PM2021-07-17T15:04:03+5:302021-07-17T15:10:35+5:30

LPG Gas Cylinder : काही दिवसांपूर्वी असा नियम होता की, केवळ अ‍ॅड्रेस प्रूफ असलेले लोकच एलपीजी सिलिंडर घेऊ शकतात, परंतु आता देशातील सरकारी तेल कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने (IOCL) सामान्य लोकांना दिलासा दिला आहे.

lpg gas cylinder booking without address proof know how  | LPG Gas Cylinder : अ‍ॅड्रेस प्रूफशिवाय खरेदी करु शकता गॅस सिलिंडर; जाणून घ्या, कसा अर्ज करायचा? 

LPG Gas Cylinder : अ‍ॅड्रेस प्रूफशिवाय खरेदी करु शकता गॅस सिलिंडर; जाणून घ्या, कसा अर्ज करायचा? 

नवी दिल्ली : जर तुम्ही एलपीजी कनेक्शन (LPG Gas Cylinder) घेण्याचा विचार करत असाल आणि आपल्याकडे अ‍ॅड्रेस प्रूफ नसेल तरीही तुम्ही सिलिंडर खरेदी करू शकता. दरम्यान, काही दिवसांपूर्वी असा नियम होता की, केवळ अ‍ॅड्रेस प्रूफ असलेले लोकच एलपीजी सिलिंडर घेऊ शकतात, परंतु आता देशातील सरकारी तेल कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने (IOCL) सामान्य लोकांना दिलासा दिला आहे. एलपीजीवरील संबंधीची सक्ती रद्द करण्यात आली आहे. म्हणजेच, तुम्ही अ‍ॅड्रेस प्रूफशिवायही गॅस घेऊ शकता.

'या' ठिकाणी खरेदी करू शकता सिलिंडर
ग्राहक त्यांच्या शहराजवळ किंवा त्यांच्या शेजारच्या इंडियन गॅस वितरक किंवा पॉईंट ऑफ सेलला भेट देऊन 5 किलो एलपीजी सिलिंडर खरेदी करू शकतात. आपल्याला यासाठी कोणतेही दस्तऐवज प्रदान करण्याची आवश्यकता नाही. आपल्याला फक्त सिलेंडरची किंमत मोजावी लागेल आणि सिलिंडर घरी घेऊन जावे लागेल. इंडेनटचा 5 किलो सिलिंडर विक्रीच्या ठिकाणाहून भरला जाऊ शकतो. हे सिलिंडर बीआयएस (BIS) प्रमाणित आहेत.

कसे परत करू शकता सिलिंडर?
जर तुम्ही शहर सोडत असल्यास किंवा कोणत्याही कारणास्तव तुम्ही गॅस सिलिंडर इंडेनच्या विक्री ठिकाणावर परत करू शकता. पाच वर्षांत परत केल्यास सिलिंडरच्या किंमतीपैकी 50 टक्के परत मिळेल आणि 5 वर्षानंतर ते परत केल्यानंतर 100 रुपये मिळतील.

घरबसल्या करा बुक...
एजन्सीकडून खरेदी करण्याशिवाय तुम्ही रिफिलसाठी बुक देखील करू शकता. बुक करण्याची पद्धत देखील खूप सोपी आहे. यासाठी कोठेही जाण्याची आवश्यकता नाही, म्हणजेच घरी बसून सिलिंडर बुक करता येतो. इंडेनने यासाठी एक विशेष क्रमांक जारी केला आहे, जो 8454955555 असा आहे. या नंबरवर मिस्ड कॉल देऊन तुम्ही देशाच्या कोपऱ्यातून एक सिलिंडर बुक करू शकता.

तुमची इच्छा असेल तर व्हॉट्सअॅपवरुन तुम्ही सिलिंडरही बुक करू शकता. याशिवाय, रिफिल टाइप करून तुम्ही 7588888824 नंबरवर मेसेज पाठविल्यानंतर तुमचे सिलिंडर बुक केले जाईल. तसेच, तुम्ही 7718955555 या नंबरवर कॉल करूनही सिलिंडर बुक करू शकता.