lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > गॅस सिलेंडर बुकिंगवर मिळतोय बंपर कॅशबॅक; जाणून घ्या, कसा मिळेल फायदा

गॅस सिलेंडर बुकिंगवर मिळतोय बंपर कॅशबॅक; जाणून घ्या, कसा मिळेल फायदा

गॅस सिलेंडर बुकिंगवर मिळतोय बंपर कॅशबॅक; असा मिळेल फायदानवी दिल्ली - वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे पार मोडले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 02:26 PM2021-12-09T14:26:01+5:302021-12-09T14:26:53+5:30

गॅस सिलेंडर बुकिंगवर मिळतोय बंपर कॅशबॅक; असा मिळेल फायदानवी दिल्ली - वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे पार मोडले आहे.

LPG cylinder cashback offer book gas cylinder and get cashback know the process | गॅस सिलेंडर बुकिंगवर मिळतोय बंपर कॅशबॅक; जाणून घ्या, कसा मिळेल फायदा

गॅस सिलेंडर बुकिंगवर मिळतोय बंपर कॅशबॅक; जाणून घ्या, कसा मिळेल फायदा

LPG Cylinder Booking : गॅस सिलेंडर बुकिंगवर मिळतोय बंपर कॅशबॅक; असा मिळेल फायदानवी दिल्ली - वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे पार मोडले आहे. अगदी स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमतीही दर महिन्याला वाढताना दिसत आहेत. यातच, आम्ही आपल्यासाठी एक खास डील घेऊन आलो आहोत. याअंतर्गत, आपल्याला 14.2 किलोच्या गॅस सिलेंडरवर निश्चितपणे कॅशबॅक मिळेल.


खरेतर, डिजिटल पेमेंट सुविधा देणाऱ्या पॉकेट्स अॅपद्वारे गॅस सिलिंडरच्या बुकिंगवर ग्राहकांना 10 टक्के कॅशबॅक मिळू शकतो. हे अॅप आयसीआयसीआय बँकेद्वारे (ICICI Bank) चालवीले जाते. तर जाणून घेऊया, आपल्याला कशा प्रकारे मिळू शकतो कॅशबॅक... 

महिन्याला 3 बिल पेमेंटवर कॅश बॅक - 
जर तुम्ही पॉकेट्स अॅपद्वारे 200 रुपये किंवा त्याहून अधिक बिल पेमेंट केले तर, तुम्हाला 10 टक्के कॅशबॅक मिळेल. ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना कोणताही प्रोमोकोड टाकण्याची गरज नाही. पण लक्षात ठेवा ही ऑफर फक्त महिन्याच्या 3 बिल पेमेंटवरच वैध असेल. कंपनीच्या नियमांनुसार एका तासात फक्त 50 यूजर्स या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, बिल पेमेंट केल्यानंतर आपण एका तासात जास्तीत जास्त 1 रिवार्ड/कॅशबॅक आणि महीन्याला 3 रिवार्ड/कॅशबॅक मिळवू शकता.

अशी करा बुकिंग - 
1. हा फायदा घेण्यासाठी आपल्याला आपले Pockets वॉलेट अॅप ओपन करावे लागेल. 
2. आता यात Recharge and Pay Bills सेक्शन मध्ये Pay Bills वर क्लिक करा.
3. यानंतर, Choose Billers मध्ये More ऑप्शनवर क्लिक करा.
4.यानंतर आपल्यासमोर LPG चे ऑप्शन येईल.
5. आता सर्व्हिस प्रोव्हायडरची निवड करा आणि अपला मोबाइल नंबर टाका.
6. आता आपली बुकिंग अमाउंट सिस्टमच्या माध्यमाने दर्षवली जाईल. 
7. यानंतर आपल्याला बुकिंग अमाउंटचे पेमेंट करावे लागेल. 
8. ट्रांझॅक्शननंतर 10% च्या हिशेबाने आपल्याला जास्तीत जास्त 50 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. हे ओपन करताच कॅशबॅक अमाउंट आपल्या पॉकेट्स व्हॉलेटमध्ये  क्रेडिट केले जातील.

Web Title: LPG cylinder cashback offer book gas cylinder and get cashback know the process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.