हतरुण: कामाच्या ठिकाणी तलाठ्यांना राहणे बंधनकारक असताना हातरुण येथील तलाठी कार्यालयाला कुलूप असल्याचे २३ जानेवारी रोजी दिलेल्या भेटीदरम्यान आढळले. महसूल प्रशासन आणि जनतेचा दुवा म्हणून तलाठ्यांकडे पाहिले जाते. गावपातळीवर लोकांच्या अडीअडचणीत उपयोगी येणार्या गावच्या तलाठी कार्यालयात हजर न राहता अप-डाउन करतात. हातरुण महसूल मंडळ अधिकारी व तलाठी एकत्रच हातरून येथील कार्यालयात बसून नागरिकांच्या समस्या सोडवतात; पण अनेक वेळा तलाठी कार्यालय बंदच असल्याने नागरिकांना आल्या पावली परत जावे लागते. याचबरोबर ज्या दिवशी तलाठी गाव सोडून बाहेर जातात त्या दिवसाचा नियोजित दौरा, बैठका, याबाबतची माहिती कार्यालयाच्या सूचना फलकावर लिहिल्या जात नाही. याचबरोबर स्वत:चा मोबाइल क्रमांक, मंडल अधिकार्यांचा व नायब तहसीलदार यांचाही मोबाइल क्रमांक सूचना फलकावर लिहिण्यात आला नाही. सेवा हमी कायद्यांतर्गत सर्व बाबींची माहिती कार्यालयाच्या आवारात लावण्यात आली नाही. सध्या हातरुण परिसरातून रेतीची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असून तलाठी कार्यालय २३ जानेवारी रोजी बंद होते. त्यामुळे रेती वाहतूक बिनदिक्कतपणे सुरू होती.फोटो आहे
हातरुण तलाठी कार्यालयाला कुलूप
हातरुण: कामाच्या ठिकाणी तलाठ्यांना राहणे बंधनकारक असताना हातरुण येथील तलाठी कार्यालयाला कुलूप असल्याचे २३ जानेवारी रोजी दिलेल्या भेटीदरम्यान आढळले.
By admin | Published: January 23, 2017 08:13 PM2017-01-23T20:13:20+5:302017-01-23T20:13:20+5:30