गुरुग्राम : ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडने ‘अपने दिल की सुनो या डील की, ह्युंदाई तो घर ले ही आओगे!’ ही नवी कॅम्पेन लाँच केले आहे. यामध्ये कंपनीसोबत नुकतेच जोडले गेलेले ब्रँड ॲम्बॅसडर आणि प्रसिद्ध अभिनेते पंकज त्रिपाठी झळकणार आहेत. पंकज त्रिपाठी यांनी आपल्या वैशिष्ट्यपू्र्ण शैलीत आणि करिश्माई अभिनयाने या फिल्ममध्ये जीव ओतला आहे. त्यामुळे ही कॅम्पेन सर्वांच्या लक्षात राहणार आहे, लोकांना जोडणारे ठरणार आहे.
लाँचिंगवेळी कंपनीचे मार्केटिंग हेड विराट खुल्लर म्हणाले की, आमचे कॅम्पेन म्हणजे उत्कृष्ट फीचर्सने भरलेल्या आणि विश्वासार्ह कार वितरित करण्याच्या एक उत्सव आहे. यामुळे ग्राहकांना उत्कृष्ट मूल्य आणि अद्वितीय अनुभव मिळतो. पंकज त्रिपाठी यांच्यामुळे ब्रँडबद्दलचा ग्राहकांचा विश्वासही दृढ होतो.
हे कॅम्पेन टीव्ही, प्रिंट, डिजिटल आणि रेडिओ प्लॅटफॉर्मवर चालवली जाणार आहे. अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कॅम्पेन गुजराती, मराठी, बंगाली, कन्नड, मल्याळम, तमिळ आणि तेलुगू या सात प्रादेशिक भाषांमध्ये तयार करण्यात आलेले आहे. यामुळे विविध भागांतील लोकांवर याचा मजबूत आणि टिकाऊ प्रभाव सुनिश्चित होईल. या कॅम्पेनमधून स्पर्धात्मक बाजारात ह्युंदाईच्या कार कशा वेगळ्या आहेत, हे अधोरेखित होते. कंपनीची विश्वासार्हता दिसून येते.