Lokmat Money > बिझनेस न्यूज > लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   

लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   

Hindustan Unilever GST Rate: कंपनीने एका वृत्तपत्रात दिलेल्या जाहिरातीत डव, क्लिनिक प्लस, सनसिल्क शाम्पूसह लाईफबॉय, लक्स साबण, क्लोझअप टुथपेस्ट, हॉर्लिक्स, ब्रू सारख्या उत्पादनांच्या किंमती जाहीर केल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 18:44 IST2025-09-13T18:36:40+5:302025-09-13T18:44:05+5:30

Hindustan Unilever GST Rate: कंपनीने एका वृत्तपत्रात दिलेल्या जाहिरातीत डव, क्लिनिक प्लस, सनसिल्क शाम्पूसह लाईफबॉय, लक्स साबण, क्लोझअप टुथपेस्ट, हॉर्लिक्स, ब्रू सारख्या उत्पादनांच्या किंमती जाहीर केल्या आहेत.

Lifebuoy soap 8, Dove shampoo 55, toothpaste 16 rupees cheaper; Hindustan Unilever GST Rate Cut list is out... | लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   

लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   

जीएसटी कपातीचा परिणाम आता सामान्य ग्राहकांच्या दररोजच्या वापराच्या वस्तूंवर होणार आहे. देशातील सर्वात मोठ्या एफएमसीजी कंपन्यांपैकी एक असलेल्या हिंदुस्तान युनिलिव्हरने शाम्पूपासून ते कॉफीपर्यंतच्या किंमतींवर कपात जाहीर केली आहे. लवकरच ही नवीन किंमतीतील उत्पादने दुकानांपर्यंत पोहोचणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. 

कंपनीने एका वृत्तपत्रात दिलेल्या जाहिरातीत डव, क्लिनिक प्लस, सनसिल्क शाम्पूसह लाईफबॉय, लक्स साबण, क्लोझअप टुथपेस्ट, हॉर्लिक्स, ब्रू सारख्या उत्पादनांच्या किंमती जाहीर केल्या आहेत. ही कपात ५ रुपयांपासून ते ५०-६०, ९० रुपयांपर्यंत आहे. 

या उत्पादनांच्या किंमती पहा...

३४० मिली डव्ह शॅम्पूची बाटली ४९० रुपयांवरून ४३५ रुपयांवर येईल.

हॉर्लिक्सच्या २०० ग्रॅम जारची किंमत १३० रुपयांवरून ११० रुपयांवर येईल.

२०० ग्रॅम किसान जॅम ९० रुपयांवरून ८० रुपयांना उपलब्ध होईल.

७५ ग्रॅम लाईफबॉय साबणाची किंमत आता ६० रुपयांवर येईल, जी पूर्वी ६८ रुपयांवर होती.

क्लिनिक प्लस ३५५ मिली शॅम्पू ३९३ रुपयांवरून ३४० रुपयांवर येईल.

सनसिल्क ब्लॅक साइन शॅम्पू ३५० मिली ची किंमत ४३० रुपयांवरून ३७० रुपयांवर येईल.

डव्ह सीरम ७५ ग्रॅमची किंमत ४५ रुपयांवरून ४५ रुपयांवर येईल. 

लाइफबॉय साबण (७५ ग्रॅम X ४) ६० रुपयांना उपलब्ध असेल. 

लक्स साबण (७५ ग्रॅम X ४) ९६ रुपयांवरून ८५ रुपयांना उपलब्ध होईल.

क्लोजअप टूथपेस्ट (१५० ग्रॅम) १४५ रुपयांवरून १२९ रुपयांना उपलब्ध होईल.

लॅक्मे ९ ते ५ पीएम कॉम्पॅक्ट ९ ग्रॅम ६७५ रुपयांवरून ५९९ रुपयांवर कमी करण्यात आले आहे.

किसान केचप (८५० ग्रॅम) १०० रुपयांवरून ९३ रुपयांवर कमी करण्यात आले आहे.

हॉर्लिक्स वुमन ४०० ग्रॅमची किंमत ३२० रुपयांवरून २८४ रुपयांवर कमी करण्यात आली आहे.

ब्रू कॉफी ७५ ग्रॅमची किंमत ३०० रुपयांवरून २७० रुपयांवर कमी करण्यात आली आहे.

नॉर टोमॅटो सूप ६७ ग्रॅमची किंमत ६५ रुपयांवरून ५५ रुपयांवर कमी करण्यात आली आहे.

बूस्ट २०० ग्रॅमची किंमत १२४ रुपयांवरून आता ११० रुपये करण्यात आली आहे.

 

Web Title: Lifebuoy soap 8, Dove shampoo 55, toothpaste 16 rupees cheaper; Hindustan Unilever GST Rate Cut list is out...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :GSTजीएसटी