लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : आधारद्वारे करण्यात येणारी केवायसी (नो युअर कस्टमर) आता अधिक सोपी, सुरक्षित आणि वापरकर्ता-स्नेही होणार आहे. ‘भारतीय विशेष ओळख प्राधिकरण’ (यूआयडीएआय) त्यासाठी नवी योजना बनवत आहे. उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, नवी केवायसी व्यवस्था अधिक गतिमान असेल. ‘यूआयडीएआय’कडून करण्यात येणार असलेल्या या बदलांबाबत जाणून घेऊ.
आधार केवायसीसाठी वैयक्तिक तपशील शेअर करण्याची गरज नाही. बायोमेट्रिक ओटीपीचीही गरज नाही. केवायसीसाठी क्यूआर कोड आणि पीडीएफ फॉरमॅटचा वापर केला जाईल.
यात आधार क्रमांक सामायिक होणार नाही. त्यामुळे सुरक्षितता वाढेल. बँका, फिनटेक कंपन्या आणि विमा कंपन्यांकडून ही सुविधा लवकर स्वीकारली जाईल.