Vodafone Idea Stock Price: सोमवारी, ९ फेब्रुवारी रोजी व्होडाफोन आयडियाच्या शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात सुमारे ३ टक्क्यांच्या वाढीसह झाली. कंपनीचे प्रमोटर कुमार मंगलम बिर्ला यांनी गेल्या आठवड्यात कंपनीचे अतिरिक्त शेअर्स खरेदी केल्यामुळे ही तेजी पाहायला मिळाली आहे. कुमार मंगलम बिर्ला यांनी ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान खुल्या बाजारातून एकूण ४.०९ कोटी शेअर्स खरेदी केले आहेत.
शेअर्सच्या खरेदीचा तपशील
३० जानेवारी: सरासरी १०.९५ रुपये प्रति शेअर या भावाने २.२१ कोटी शेअर्स खरेदी केले.
१ फेब्रुवारी: सरासरी ११.१३ रुपये प्रति शेअर या भावाने १.८८ कोटी शेअर्स खरेदी केले. ही खरेदी कंपनीच्या एकूण इक्विटीच्या सुमारे ०.०३% इतकी आहे.
सोन्याच्या दरात ₹३५१५ ची तेजी, पाहा १८ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
शेअरची सध्याची स्थिती आणि कामगिरी
सोमवारी सकाळच्या सुमारास व्होडाफोन आयडियाचे शेअर्स २.९७ टक्क्यांच्या वाढीसह ११.४५ रुपयांवर व्यवहार करत होते. शेअरची कामगिरी पाहायची झाली तर गेल्या ५ दिवसांत यात ५.२५ टक्क्यांची तेजी आली. तर गेल्या एका महिन्यात १.७८ टक्क्यांची वाढ झाली. तर दुसरीकडे गेल्या ६ महिन्यांत या टेलिकॉम स्टॉकने ७३ टक्क्यांहून अधिक परतावा दिलाय. तर गेल्या वर्षभरात शेअर्समध्ये २५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. मात्र, या वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत यात १.२१ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली.
प्रमोटरचा हिस्सा आणि विश्वासाचे संकेत
डिसेंबर २०२५ पर्यंत, कुमार मंगलम बिर्ला यांच्याकडे व्होडाफोन आयडियामध्ये ०.०२% (सुमारे १.९४ कोटी शेअर्स) हिस्सा होता. सर्व प्रमोटर्सचा मिळून या टेलिकॉम कंपनीत एकूण २५.५% हिस्सा आहे. जेव्हा शेअरची किंमत अलीकडील उच्चांकावरून खाली आली आहे, अशा वेळी बिर्ला यांनी केलेली ही खरेदी कंपनीवरील त्यांचा विश्वास दर्शवते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एजीआर (AGR) थकबाकीवर दिलासा मिळाल्यानंतर डिसेंबरमध्ये या शेअरनं १२.८ रुपयांचा ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला होता.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
