Lokmat Money > बिझनेस न्यूज > १ मे पासून तुम्हाला YouTube वर मनोरंजन कंटेन्ट मिळणार नाही? काय आहे JioStar चा प्लॅन?

१ मे पासून तुम्हाला YouTube वर मनोरंजन कंटेन्ट मिळणार नाही? काय आहे JioStar चा प्लॅन?

jiostar : जिओस्टार गुगलच्या मालकीच्या व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म YouTube वरून मनोरंजन कंटेन्ट काढून टाकू शकते. जेणेकरून ग्राहकांना लिनियर टीव्हीवरून मोफत डिजिटल स्ट्रीमिंगवर जाण्यापासून रोखता येईल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 12:12 IST2025-03-14T11:59:35+5:302025-03-14T12:12:23+5:30

jiostar : जिओस्टार गुगलच्या मालकीच्या व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म YouTube वरून मनोरंजन कंटेन्ट काढून टाकू शकते. जेणेकरून ग्राहकांना लिनियर टीव्हीवरून मोफत डिजिटल स्ट्रीमिंगवर जाण्यापासून रोखता येईल.

jiostar likely to remove entertainment content from youtube from may 1 2025 | १ मे पासून तुम्हाला YouTube वर मनोरंजन कंटेन्ट मिळणार नाही? काय आहे JioStar चा प्लॅन?

१ मे पासून तुम्हाला YouTube वर मनोरंजन कंटेन्ट मिळणार नाही? काय आहे JioStar चा प्लॅन?

jiostar : सध्याच्या घडीला जगात सर्वाधिक वापरले जाणारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूट्यूब आहे. या माध्यमावर जगभरातील व्हिडीओ कंटेन्ट तुम्हाला मोफत पाहाता येतो. नाही म्हणायला अधून-मधून १५ सेकंदाची जाहिरात येते. पण, ती वगळता यासाठी तुम्हाला एकही रुपया मोजावा लागत नाही. जर या जाहिराती नको असतील तर तुम्ही यूट्यूबचे सब्सक्रिप्शन नाममात्र दरात विकत घेऊ शकता. यूट्यूबवर सर्वाधिक मनोरंजनात्मक कंटेन्ट पाहिला जातो. पण, यापुढे तुम्ही यूट्यूबवर असा कंटेन्ट पाहू शकणार नाही, असं म्हटलं तर? यामागे जिओहॉटस्टरचं आर्थिक गणित दडलं आहे. जिओहॉटस्टार गुगलच्या मालकीच्या व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म YouTube वरून त्यांचा मनोरंजन कंटेन्ट काढून टाकू शकते.

फ्री कंटेन्ट बंद केला तर जास्तीत जास्त ग्राहक जिओहॉटस्टारचे सब्सक्रिप्शन घेतील, असा कंपनीचा प्लॅन आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी १ मे पासून याची अंमलबजावणी करू शकते. परंतु, अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. काही दिवसांपूर्वी डिस्नेच्या स्टार इंडिया आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वायाकॉम १८ या कंपन्यांचे विलीनीकरण करण्यात आले. कंपनीने जिओहॉटस्टार वर पेवॉलच्या मागे प्रीमियम कंटेन्ट ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे, ज्यामध्ये विलीन होण्यापूर्वी २ वर्षांसाठी स्पोर्ट्ससह प्रीमियम कंटेन्ट विनामूल्य ऑफर करण्यात आले होता. पण, या निर्णयाने पे-टीव्ही आणि सबस्क्रिप्शन व्हिडिओ-ऑन-डिमांड (SVOD) दोन्ही सेवांवर परिणाम केला.

पे-टीव्ही प्लॅटफॉर्म एकत्र येणार
यूट्यूबसारख्या माध्यमावर मोफत मनोरंजन होत असल्याने पे टीव्ही प्लॅटफॉर्मचे (रिचार्ज करुन कंटेन्ट पाहणे) नुकसान होत आहे. याविरोधात आता सर्व पे-टीव्ही प्लॅटफॉर्म जसे की टाटा प्ले, एअरटेल डिजिटल टीव्ही, जीटीपीएल हॅथवे, जिओहॉटस्टार, झी एन्टरटेनमेंट आणि सॉनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया एकत्र येण्याची शक्यता आहे. पे चॅनेल ब्रॉडकास्ट्स आता यूट्यूबसारख्या माध्यमांवरुन आपला कंटेन्ट हटवू शकते.

पे-टीव्ही सब्सक्रिप्शन
पे-टीव्ही सबस्क्रिप्शनमध्ये ८ कोटी ४० लाखांहून अधिक ग्राहकांची घट झाल्याने व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. यामुळे कंपन्या आपले ग्राहक वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. फिक्की-ईवाई अहवालानुसार, टीव्ही सबस्क्रिप्शन मार्केट अंदाजे ४०,००० कोटी रुपयांचे आहे.

Web Title: jiostar likely to remove entertainment content from youtube from may 1 2025

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.