OTT प्लॅटफॉर्म JioHotstar च्या सबस्क्रायबर्सच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. सबस्क्राइबर्सची संख्या फक्त तीन महिन्यात 5 कोटींहून 28 कोटींपर्यंत पोहोचली आहे. IPL हे या वाढीचे कारण असल्याचे मानले जाते. JioHotstar च्या सबस्क्राइबर्सची संख्या Netflix च्या जागतिक सबस्क्राइबर्सच्या संख्येच्या जवळ आली आहे. Netflix चे जागतिक सबस्क्राइबर्स 30 कोटी आहेत.
मार्चमध्ये फक्त 5 कोटी सबस्क्राइबर्स
फायनान्शियल टाईम्सच्या अहवालानुसार, मार्च 2025 मध्ये JioHotstar च्या सबस्क्राइबर्सची संख्या 5 कोटी होती, जी फक्त IPL दरम्यान 28 कोटी झाली. ही संख्या कंपनीच्या पेड सबस्क्राइबर्सची आहे.
अल्पावधीत मोठे यश
JioHotstar ने खूप कमी वेळात मोठे यश मिळवले आहे. सुमारे 6 महिन्यापूर्वी JioHotstar लॉन्च करण्यात आले होते. डिस्ने+ हॉटस्टार आणि जिओसिनेमाच्या विलीनीकरणानंतर हा नवीन ओटीटी प्लॅटफॉर्म अस्तित्वात आला. सध्या या प्लॅटफॉर्मकडे आयपीएलच्या डिजिटल आणि टीव्ही दोन्हीचे अधिकार आहेत.
कंपनीला आशा आहे की, आयपीएलनंतरही प्रेक्षकांची ही संख्या त्यांच्या प्लॅटफॉर्मवर कायम राहील. आयपीएलचा अंतिम सामना 3 जून रोजी होणार आहे. दरम्यान,, JioHotstar वर हॉलिवूड चित्रपटांपासून ते मालिकांपर्यंत अनेक कंटेंट उपलब्ध आहेत. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला पॅरामाउंट, पिक्सार, HBO, डिस्ने आणि इतर बॅनरचे शो मिळतील.