Lokmat Money > बिझनेस न्यूज > घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

recharge plans : जर तुमच्या घरात आणि ऑफिसमध्ये वाय-फाय असेल आणि तुम्ही परवडणाऱ्या रिचार्ज प्लॅनच्या शोधात असाल तर आज आम्ही तुम्हाला जिओ, एअरटेल आणि VI च्या अशा रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 12:24 IST2025-04-27T12:16:27+5:302025-04-27T12:24:26+5:30

recharge plans : जर तुमच्या घरात आणि ऑफिसमध्ये वाय-फाय असेल आणि तुम्ही परवडणाऱ्या रिचार्ज प्लॅनच्या शोधात असाल तर आज आम्ही तुम्हाला जिओ, एअरटेल आणि VI च्या अशा रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत.

jio airtel vi bsnl recharge plans with calling benefit best for wifi users | घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

recharge plans : आजकाल इंटरनेट ही लोकांची गरज बनली आहे. भारतातील तरुण रोज सरासरी ३ तास मोबाईलवर वापरण्यात घालवतात. अनेक लोकांनी त्यांच्या घरात वाय-फाय बसवले आहे जेणेकरून ते अमर्यादित आणि हाय-स्पीड इंटरनेट वापरू शकतील. ऑफिसच्या ठिकाणी तर वाय-फाय मिळतेच. अशा परिस्थितीत, तुम्ही कमी किमतीचा रिचार्ज करुन बरेच पैसे महिन्याला वाचवू शकता. तुम्ही परवडणाऱ्या रिचार्ज प्लॅनच्या शोधात असाल, ज्यामध्ये तुम्हाला डेटाशिवाय अमर्यादित कॉलिंगचा फायदा मिळेल, तर आज आम्ही तुम्हाला जिओ, एअरटेल आणि VI, BSNL च्या अशा रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत. या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला फक्त कॉलिंग आणि एसएमएसचा फायदा मिळेल.

जिओचा १७४८ रुपयांचा प्लॅन
जिओचा हा १७४८ रुपयांचा प्लॅन ३३६ दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित मोफत कॉलिंग आणि एकूण ३६०० मोफत एसएमएसचा फायदा मिळेल. या प्लॅनमध्ये तुम्हाला Jio TV आणि Jio AI क्लाउडचे सबस्क्रिप्शन देखील मिळेल.

एअरटेलचा १८४९ रुपयांचा प्लॅन
एअरटेलचा हा १८४९ रुपयांचा प्लॅन पूर्ण ३६५ दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित मोफत कॉलिंग आणि एकूण ३६०० मोफत एसएमएसचा फायदा मिळेल. या प्लॅनमध्ये तुम्हाला स्पॅम कॉल आणि एसएमएस अलर्ट, अपोलो २४/७ सर्कल आणि मोफत हॅलोट्यूनचा फायदा देखील मिळेल.

वाचा - TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?

Vi चा १८४९ रुपयांचा प्लॅन
१८४९ रुपयांचा हा व्हीआयचा प्लॅन पूर्ण ३६५ दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित मोफत कॉलिंग आणि एकूण ३६०० मोफत एसएमएसचा फायदा मिळेल.

Web Title: jio airtel vi bsnl recharge plans with calling benefit best for wifi users

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.