lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Hero MotoCorp ला मोठा धक्का! कंपनीत १ हजार कोटींचा घोटाळा उघडकीस; करचोरीचाही ठपका

Hero MotoCorp ला मोठा धक्का! कंपनीत १ हजार कोटींचा घोटाळा उघडकीस; करचोरीचाही ठपका

दिल्लीतील एका फार्म हाऊससाठी १०० कोटी रुपयांचा रोख व्यवहार केल्याचे पुरावे प्राप्तिकर विभागाला मिळाल्याचे सांगितले जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 09:44 AM2022-03-30T09:44:14+5:302022-03-30T09:44:14+5:30

दिल्लीतील एका फार्म हाऊससाठी १०० कोटी रुपयांचा रोख व्यवहार केल्याचे पुरावे प्राप्तिकर विभागाला मिळाल्याचे सांगितले जात आहे.

it department found hero motocorp raised 1000 crore bogus expenses md used 100 crore black money to purchase farmhouse | Hero MotoCorp ला मोठा धक्का! कंपनीत १ हजार कोटींचा घोटाळा उघडकीस; करचोरीचाही ठपका

Hero MotoCorp ला मोठा धक्का! कंपनीत १ हजार कोटींचा घोटाळा उघडकीस; करचोरीचाही ठपका

नवी दिल्ली: देशातील सर्वांत मोठी दुचाकी कंपनी असलेल्या हिरो मोटोकॉर्पचे (Hero MotoCorp) चेअरमन आणि एमडी पवन मुंजाल यांच्या ठिकाणांवर प्राप्तिकर विभागाने अलीकडेच छापेमारी केली. मिळालेल्या माहितीनुसार, पवन मुंजाल यांच्या निवासस्थानांवर आणि गुडगांवमधील ऑफिसमध्ये प्राप्तिकर विभागाने सर्च ऑपरेशन राबवले. यानंतर आता कंपनीने ०१ हजार कोटींहून अधिक बनावट खर्च दाखवून कर वाचविला आणि दिल्लीतील छत्तरपूर येथील फार्म हाऊससाठी १०० कोटी रुपयांचा रोख व्यवहार केल्याची माहिती देण्यात आली आहे. 

हिरो मोटोकॉर्पचे अध्यक्ष व मुख्याधिकारी पवन मुंजाल यांच्या ठिकाणांवर प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या धाडीनंतर एकच खळबळ उडाली होती. मुंजाल यांच्यासह, प्रवर्तकांच्या कार्यालयावर व घरावर प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी २३ मार्चला छापे टाकत काही आर्थिक दस्त आणि कागदपत्रे ताब्यात घेतली होती. कंपनीने करचुकवेगिरी केल्याचा संशय प्राप्तिकर विभागाने व्यक्त केला होता. त्या अनुषंगाने अध्यक्षांसह इतर प्रवर्तकांच्या दिल्ली एनसीआरसह ४० ठिकाणांची प्राप्तिकर विभागाकडून झडती घेण्यात आली होती.

आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे पुरावे जप्त 

हिरो मोटोकॉर्प कंपनीच्या दिल्ली, गुडगांव येथील कार्यालयांत प्राप्तिकर विभागाचे तपास पथक दाखल झाले होते. त्यावेळी आर्थिक व्यवहारांची तपासणी, दस्तऐवजांची छाननी व डिजिटल माहितीच्या रुपात  आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे पुरावे जप्त करण्यात आले. कंपनीने करपात्र उत्पन्नात कपात करण्यासाठी, १,००० कोटींहून अधिक रुपयांचे बनावट खर्च दाखवल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे. याचबरोबर दिल्लीजवळील भागात एका फार्म हाऊसच्या खरेदीमध्ये १०० कोटींहून अधिक मूल्याचा व्यवहार रोख स्वरूपात केल्याचा पुरावाही प्राप्तिकर विभागाला मिळाला आहे.

दरम्यान, हिरो मोटोकॉर्प कंपनीच्या उत्पादनाची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असते. दुचाकी बनवणारी जगातील सर्वांत मोठी दुसऱ्या क्रमांकाची कंपनी म्हणून हिरोने ओळख मिळवली. गेल्या २० वर्षांत आपले वर्चस्व निर्माण केले आहे. कंपनीचे आशिया, दक्षिण आफ्रिका आणि सेंट्रल अमेरिका समवेत ४० देशांमध्ये आपले साम्राज्य पसरलेले आहे. घरगुती बाजारामध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त हिस्सेदारी हिरो मोटोकॉर्पची असल्याचे सांगितले जात आहे. 
 

Web Title: it department found hero motocorp raised 1000 crore bogus expenses md used 100 crore black money to purchase farmhouse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.