जर तुम्ही सातत्याने प्रवास करत असल्यास तुम्ही ट्रॅव्हल विमा घेण्याचा नक्की विचार करा. कारण यामुळे तुम्हाला प्रवास करताना कधी उशीर झाल्यास, अपघात किंवा आजारी पडल्यास आर्थिक संरक्षण मिळण्यासाठी ट्रॅव्हल विमा अतिशय गरजेचा ठरतो. ट्रेन, बस किंवा विमान तिकिटांवर काढलेला प्रवास विमा आर्थिक मदत मिळवून देतो. याव्यतिरिक्त, पासपोर्टचे नुकसान, विमानाला उशीर किंवा रद्द झाल्यासही हा विमा फायदेशीर ठरतो.
काय असतो ट्रॅव्हल इन्शुरन्स?
विमा प्रवासादरम्यान जर काही अनपेक्षित घडले, तर त्यापासून तुम्हाला आर्थिक संरक्षण देतो. प्रवासादरम्यान तुम्ही जखमी झाल्यास वैद्यकीय खर्च या विम्यांतर्गत केला जातो. जर तुम्हाला कोणत्याही कारणास्तव तुमची ट्रिप रद्द करावी लागली, तर तिकिटाची आणि इतर खर्चाची भरपाईही यातून मिळते. प्रवासादरम्यान सामान हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास नुकसानभरपाईदेखील मिळते. यामुळे प्रवास सुरक्षित आणि कोणताही तणाव न घेता होतो.
या विम्याचे फायदे काय?
nप्रवासादरम्यान अचानक आजारी पडल्यास वैद्यकीय खर्चापासून संरक्षण मिळते.
nकोणत्याही कारणास्तव तुम्हाला तुमचा प्रवास रद्द करावा लागला, तर तुम्ही तिकिटाची रक्कम परत मिळवू शकता.
nआपत्कालीन परिस्थितीत सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी व्यवस्था होते.
nतुमच्या प्रवासाला उशीर झाल्यास तुम्ही अतिरिक्त दिवस राहण्यासाठी हॉटेल आणि जेवणाच्या खर्चासाठी कव्हरेज मिळवू शकता.
nपरदेशात प्रवास करताना अनेकदा न सांगून काही घटना घडतात. अशावेळी हा विमा मदतीला येतो.
हा विमा का घ्यावा?
ट्रॅव्हल विमा घेताना तुम्ही तुमच्या गरजेनुसार सुविधा निवडू शकता. तुम्ही क्वचितच प्रवास करत असल्यास सिंगल-ट्रिप इन्शुरन्स पॉलिसी तुमच्यासाठी योग्य ठरते. मात्र, आपण कामासाठी वारंवार प्रवास करत असल्यास, आपण वार्षिक ट्रॅव्हल विमा पॉलिसी
निवडू शकता.