Lokmat Money > बिझनेस न्यूज > DeepSeek AI मॉडेल वापरणे किती सुरक्षित? चिनी चॅटबॉट घोळ तर करणार नाही ना?

DeepSeek AI मॉडेल वापरणे किती सुरक्षित? चिनी चॅटबॉट घोळ तर करणार नाही ना?

DeepSeek Data Privacy : डीपसीक कंपनीच्या नवीन एआय मॉडेलने जगात खळबळ उडवून दिली आहे. या चिनी चॅटबॉटने बड्या टेक कंपन्यांना घाम फोडला आहे. आता हे सुरक्षित आहे का? यावरुन वाद सुरू झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 13:15 IST2025-01-29T13:14:21+5:302025-01-29T13:15:02+5:30

DeepSeek Data Privacy : डीपसीक कंपनीच्या नवीन एआय मॉडेलने जगात खळबळ उडवून दिली आहे. या चिनी चॅटबॉटने बड्या टेक कंपन्यांना घाम फोडला आहे. आता हे सुरक्षित आहे का? यावरुन वाद सुरू झाला आहे.

is deepseek safe know privacy and security risks of chinese ai chatbot | DeepSeek AI मॉडेल वापरणे किती सुरक्षित? चिनी चॅटबॉट घोळ तर करणार नाही ना?

DeepSeek AI मॉडेल वापरणे किती सुरक्षित? चिनी चॅटबॉट घोळ तर करणार नाही ना?

DeepSeek Data Privacy : एकेकाळी चीन सर्व वस्तूंची स्वस्त कॉपी तयार करण्यासाठी कुप्रसिद्ध होता. पूर्वी चायनीज वस्तू म्हटलं की वापरा आणि टाकून द्या, अशीच पद्धत होती. चीनने आता आपली ओळख बदलली आहे. सध्या बहुतांश भारतीयांकडे चिनी कंपनीचे मोबाईल पाहायला मिळतात. दोन दिवसांपूर्वी तर ड्रॅगनने कहर केला. चीनच्या AI मॉडेल डीपसीकने जगात खळबळ उडवून दिली. हे अमेरिकेतील Apple App Store वर सर्वाधिक डाउनलोड केलेले फ्री App बनले आहे. अमेरिकन कंपन्यांचे तर धाबे दणाणले आहेत. मात्र, त्याचवेळी हे अ‍ॅप किती सुरक्षित आहे? डेटा गोपनीयता आणि संभाव्य गैरवापर याबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजेन्स तज्ज्ञांनी वापरकर्त्यांना सावधगिरीने हा चॅटबॉट वापरण्याचा आणि संवेदनशील माहिती शेअर करणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. तुमची माहिती थेट चीन सरकारकडे जाऊ शकते. याचा गैरवापर होण्याचीही शक्यता असल्याची भिती त्यांनी व्यक्त केली.

डीपसीकमध्ये माहिती चोरीचा धोका
ऑक्सफर्ड विद्यापीठातील एआयचे प्राध्यापक मायकेल वुल्ड्रिज यांनी वापरकर्त्यांना या चॅटबॉटमध्ये संवेदनशील डेटा टाकू नये असा इशारा दिला. “मला वाटते की ते डाउनलोड करणे आणि लिव्हरपूल फुटबॉल क्लबच्या कामगिरीबद्दल किंवा रोमन साम्राज्याच्या इतिहासावर चर्चा करणे ठीक आहे,” पण, यात कोणतीही संवेदनशील, वैयक्तिक किंवा गोपनीय माहिती टाकण्याची शिफारस करणार नाही. कारण, ही माहिती कुठे जाते हे तुम्हाला माहिती नाही"

सयुक्त राष्ट्राचे सल्लागार डेम वेंडी हॉल यांनीही हीच भिती व्यक्त केली. तुम्ही जर माहिती संबंधित काम करणारी चिनी कंपनी असाल तर चिनी सरकारच्या नियमानुसार ही माहिती तुम्हाला सरकारला देणे बंधनकारक आहे. डीपसीक सारख्या कंपन्यांना चीनी सरकारच्या सूचनांचे पालन करावे लागते. त्यामुळे साहजिक तुमच्या डेटाच्या गोपनीयता प्रश्न उपस्थित होतो.

डीपसीकचा गैरवापर होऊ शकतो?
डीपसीक मोफत ओपन सोर्स एआय मॉडेल असल्याने याचा वापर कुणीही करू शकते. सध्या सोशल मीडियावर नकारात्मक आणि फेक न्यूजचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. या चिनी चॅटबॉटचा वापर त्यासाठी होऊ शकतो, अशी भिती आता संशोधकांना आहे. डीपसीकच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे काही देश चिंतेत आहेत. यूकेचे तंत्रज्ञान सचिव पीटर काइल म्हणाले की ॲपमध्ये सेन्सॉरशिपचा समावेश आहे. वापरकर्त्यांनी ते डाउनलोड करण्यापूर्वी सावधगिरी बाळगली पाहिजे. 

ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय सुरक्षा संस्थांनी अद्याप या अ‍ॅपच्या वापराबाबत कोणताही औपचारिक सल्ला दिलेला नाही, मात्र ऑस्ट्रेलियाचे गृहनिर्माण मंत्री क्लेअर ओ'नील यांनी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले, "हे ॲप काही दिवसांपूर्वीच लाँच करण्यात आले होते. "आमच्या राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी सध्या त्याच्या सेटिंग्ज तपासत असून त्याची कार्यप्रणाली समजून घेत आहेत.”

अवघ्या ४६ कोटींमध्ये डीपसीकची निर्मिती
लियांग वेनफेंग या चिनी तरुणाने डीपसीक ही एआय स्टार्टअप कंपनी उभारली आहे. लिआंग वेनफेंग यांनी २०१३ मध्ये हांगझो याकेबी इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट आणि २०१५ मध्ये झेजियांग जिउझांग ॲसेट मॅनेजमेंट सारख्या कंपन्यांची स्थापना केली. या कंपन्या फारशा प्रसिद्ध झाल्या नाहीत. यानंतर, लियांग आणि त्याच्या दोन वर्गमित्रांनी क्वांटिटेटिव्ह हेज फंड हाय-फ्लायरचा पाया घातला. ही कंपनी परिमाणात्मक गुंतवणुकीसाठी गणित आणि AI चा मोठ्या प्रमाणावर वापर करते. यानंतर, २०२४ च्या शेवटी, स्टार्टअपने V3 मॉडेल लाँच केले. हे मॉडेल बनवण्यासाठी फक्त ४६ कोटी रुपये खर्च आला आहे. तर इतर कंपन्या अशा तंत्रज्ञानावर ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करतात.

Web Title: is deepseek safe know privacy and security risks of chinese ai chatbot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.