lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > IRCTC ची शानदार ऑफर! श्रीनगरसह 'या' चार ठिकाणी फिरण्याची संधी, मोफत मिळतील काही सुविधा 

IRCTC ची शानदार ऑफर! श्रीनगरसह 'या' चार ठिकाणी फिरण्याची संधी, मोफत मिळतील काही सुविधा 

IRCTC : आयआरसीटीसी टुरिझमने म्हटले आहे की, या ट्रिपदरम्यान पर्यटकांना श्रीनगर, गुलमर्ग, सोनमर्ग आणि पहलगामला जाण्याची संधी मिळेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 06:47 PM2021-08-10T18:47:55+5:302021-08-10T18:49:30+5:30

IRCTC : आयआरसीटीसी टुरिझमने म्हटले आहे की, या ट्रिपदरम्यान पर्यटकांना श्रीनगर, गुलमर्ग, सोनमर्ग आणि पहलगामला जाण्याची संधी मिळेल.

irctc tour package from mumbai to kashmir only in 27300 rupess check all details | IRCTC ची शानदार ऑफर! श्रीनगरसह 'या' चार ठिकाणी फिरण्याची संधी, मोफत मिळतील काही सुविधा 

IRCTC ची शानदार ऑफर! श्रीनगरसह 'या' चार ठिकाणी फिरण्याची संधी, मोफत मिळतील काही सुविधा 

नवी दिल्ली : जर तुम्ही काश्मीरला फिरण्यासाठी जाण्याचा प्लॅन करत असाल, तर आयआरसीटीसीने (IRCTC) तुमच्यासाठी एक विशेष ऑफर (IRCTC Tour package) आणली आहे. या ऑफरमध्ये भारतीय रेल्वे (Indian Railways) तुम्हाला स्वस्तात काश्मीरला जाण्याची सुविधा देत आहे. दरम्यान, ही ऑफर ५ रात्र आणि ६ दिवसांसाठी असेल. या ट्रिपमध्ये आपल्याला ४ सुंदर ठिकाणी फिरता येईल. आयआरसीटीसी टुरिझमने म्हटले आहे की, या ट्रिपदरम्यान पर्यटकांना श्रीनगर, गुलमर्ग, सोनमर्ग आणि पहलगामला जाण्याची संधी मिळेल. टूर पॅकेजची किंमत २७,३०० रुपये आहे.

Day 01- मुंबईहून श्रीनगर
तुम्ही मुंबईहून श्रीनगरला पोहोचाल. पहिल्या दिवशी तुम्हाला शंकराचार्य मंदिराचे दर्शन करता येईल. याशिवाय हाऊसव्होटमध्ये चेक इन करावे लागेल.त्यानंतर दुपारी आराम करा आणि संध्याकाळी डल तलावात शिकाराची सफर करता येईल. यानंतर रात्रीच्या जेवणानंतर तुम्हाला रात्रभर हाऊसव्होटमध्ये राहायला मिळेल.

Day 02 – श्रीनगर-पहलगाम
सकाळी लवकर नाश्ता केल्यानंतर श्रीनगरनंतर पहलगामला जाता येणार आहे. यादरम्यान अवंतीपुरा खंडहर, बेताब खोरे, अरू खोरे आणि चंदनवाडी देखील वाटेत फिरू शकता. यावेळी तुम्ही खोऱ्यातील नैसर्गिक पर्यटनाचा आनंद देखील घेऊ शकता. याशिवाय, तुम्ही येथे प्रेक्षणीय स्थळांना भेट देऊ शकता आणि टट्टूची सवारी करू शकता. तुम्हाला दुसऱ्या रात्री येथे राहावे लागेल. याठिकाणी जेवणाचीही सोय असेल.

Day 03 –  पहलगाम-गुलमर्ग-श्रीनगर
नाश्त्यानंतर तुम्ही गुलमर्गला जाल. यावेळी तुम्ही फुलांच्या कुरणांवर, गोंडोला राइडद्वारे गुलमर्गच्या स्थानिक प्रेक्षणीय स्थळांना भेट देऊ शकाल. त्यानंतर इथून श्रीनगरला परतावे लागेल. श्रीनगरच्या हॉटेलमध्ये रात्रीचे जेवण आणि राहण्याची सोय केली जाईल.

Day 04 – श्रीनगर – सोनमर्ग – श्रीनगर
नाश्ता केल्यानंतर श्रीनगरहून सोनमर्गला जावे लागेल. सोनमर्ग (समुद्रसपाटीपासून २८०० मीटरवर) याचा अर्थ 'सोनेरी गवताळ प्रदेश'. याठिकाणी बर्फाळ पर्वत आहेत. उन्हाळ्याच्या महिन्यांत थजीवास ग्लेशियरच्या प्रवासासाठी टट्टू भाड्याने घेऊ शकता. येथे एक दिवस फिरल्यानंतर आपल्याला श्रीनगरला परत जावे लागेल. श्रीनगरमध्ये रात्रीचे जेवण आणि राहण्याची व्यवस्था असेल.

Day 05 – श्रीनगर
नाश्त्यानंतर मोगल गार्डन फिरू शकता. निशात बाग, चेशमाशाही आणि शालिमार गार्डनलाही भेट देता येईल. त्यानंतर डल तलावाच्या काठावर असलेल्या प्रसिद्ध हजरतबल तीर्थचे दर्शन घेता येणार आहे. तुम्ही संध्याकाळी याठिकाणी खरेदी करू शकता. त्यानंतर हॉटेलमध्ये जेवण आणि राहण्याची सोय केली जाईल.

Day 06 – मुंबईसाठी रवाना
नाश्ता केल्यानंतर सकाळी आरामात हॉटेलमधून चेक आउट करा. रात्री १७:३५ वाजता श्रीनगर विमानतळावरून आपले विमान असेल. हे आपल्याला दुपारी २०:२५ पर्यंत मुंबई विमानतळावर सोडेल.
 

Web Title: irctc tour package from mumbai to kashmir only in 27300 rupess check all details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.