लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : भारतीय शेअर बाजारातील चढ-उतार आणि अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर, सरत्या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजेच डिसेंबरमध्ये गुंतवणूकदारांनी अत्यंत सावध पवित्रा घेतल्याचे चित्र समोर आले आहे.
‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया’ने (ॲम्फी) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, इक्विटी म्युच्युअल फंडमधीलगुंतवणूक मासिक आधारावर ६ टक्क्यांनी घटून २८,०५४ कोटी रुपयांवर आली आहे. विशेष म्हणजे, डेट (कर्ज) फंडांमधून १.३२ लाख कोटी रुपयांची प्रचंड मोठी रक्कम काढून घेण्यात आल्याने उद्योगाच्या एकूण मालमत्तेत घट झाली आहे.
गुंतवणूकदारांची ‘फ्लेक्सी-कॅप’ला पसंती
बाजार अस्थिर असताना गुंतवणूकदारांनी ‘फ्लेक्सी-कॅप’ फंडांवर सर्वाधिक विश्वास दाखवला आहे. या श्रेणीत १०,०१९ कोटींची मोठी गुंतवणूक झाली आहे. मिड-कॅप, लार्ज-कॅप फंडांकडे ओढा दिसून आला. ईएलएसएस (इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम) आणि लाभांश फंडांमधून गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेतले आहेत.
सोन्याकडे ओढा का?
शेअर बाजारात सावधगिरी असताना, सोन्यातील गुंतवणुकीला (गोल्ड ईटीएफ) मोठी पसंती मिळत आहे. नोव्हेंबरमध्ये गोल्ड ईटीएफमध्ये ३,७४२ कोटींची गुंतवणूक होती, ती डिसेंबरमध्ये ११,६४७ कोटींवर गेली. जागतिक अस्थिरतेच्या काळात ‘सेफ हेवन’ म्हणून सोन्याकडे पाहिले जात असल्याचे हे लक्षण आहे.
कर्ज, सोने फंडांत गुंतवणूक
प्रकार डिसेंबर (कोटी रुपये)
कर्ज म्युच्युअल फंड -१,३२,०००
गोल्ड ईटीएफ ११,६४७
इक्विटीतील गुंतवणूक?
महिना गुंतवणूक
ऑगस्ट ३३,४३०
सप्टेंबर ३०,४२१
ऑक्टोबर २४,६९०
नोव्हेंबर २९,९११
डिसेंबर २८,०५४
कोणाला किती पसंती?
फंड प्रकार निव्वळ गुंतवणूक
फ्लेक्सी-कॅप १०,०१९ कोटी
मिड-कॅप ४,१७६ कोटी
लार्ज ॲंड मिड-कॅप ४,०९४ कोटी
स्मॉल-कॅप ३,८२४ कोटी
लार्ज-कॅप १,५६७ कोटी
ईएलएसएस -७१८ कोटी
लाभांश फंड -२५४ कोटी
