नवी दिल्ली : वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी भारतीय उद्योगजगताला अधिक गुंतवणूक करण्याचे आणि उत्पादन क्षमता वाढवण्याचे आवाहन केले.
उद्योग जगतास अपेक्षित असलेल्या महत्त्वाच्या सुधारणांची अंमलबजावणी सरकारने आधीच केली आहे, असे त्या म्हणाल्या.
सीतारामन यांनी व्यवसाय सुलभीकरण (ईझ ऑफ डुइंग बिझनेस), करसवलती, परकीय गुंतवणूक (एफडीआय), उदारीकरण आणि वाढीस चालना देणाऱ्या धोरणांचा उल्लेख केला.
टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी उद्योगांनी पुढे काय करावे, असा प्रश्न विचारल्यावर सीतारामन यांनी तीन प्रमुख अपेक्षा मांडल्या अधिक गुंतवणूक करा. उत्पादन क्षमता वाढवा. सरकार तुमच्यासोबत आहे.
तरुणांच्या कौशल्य विकासासाठी सरकारसोबत भागीदारी करा.
केवळ अर्थसंकल्पापूर्वी नव्हे तर वर्षभर धोरणकर्त्यांशी संवाद ठेवा.
तरुणांना रोजगारक्षम बनवा सीतारामन यांनी म्हटले की, तरुणांना रोजगारासाठी सक्षम बनविण्यासाठी खासगी क्षेत्राने सरकारसोबत सहकार्य करण्याची गरज आहे. त्यासाठी सरकारची योजनाही आहे.
गुंतवणुकीचा विश्वास
सीतारामन यांच्या आवाहनाला प्रतिसाद देताना चंद्रशेखरन यांनी म्हटले कि, देशांतर्गत, निर्यातीसाठी सरकारने प्रचंड संधी व मजबूत व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.
जागतिक पातळीवर
पुरवठा साखळी मजबूत करण्याची मागणी असताना, पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली भारत हा गुंतवणुकीचे सर्वोत्तम ठिकाण ठरत आहे.”