Lokmat Money > बिझनेस न्यूज > LIC च्या या योजनेत एकदा पैसे गुंतवा; आयुष्यभर मिळेल १२ हजार रुपयांचं पेन्शन, जाणून घ्या काय आहे स्कीम?

LIC च्या या योजनेत एकदा पैसे गुंतवा; आयुष्यभर मिळेल १२ हजार रुपयांचं पेन्शन, जाणून घ्या काय आहे स्कीम?

भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ही सातत्यानं अनेक प्रकारच्या योजना आणते. त्याचप्रमाणे कंपनीनं पेन्शनचा लाभ देण्यासाठी लोकांना आर्थिक सुरक्षा देणारी योजनाही सुरू केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 13:34 IST2025-03-22T13:28:33+5:302025-03-22T13:34:37+5:30

भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ही सातत्यानं अनेक प्रकारच्या योजना आणते. त्याचप्रमाणे कंपनीनं पेन्शनचा लाभ देण्यासाठी लोकांना आर्थिक सुरक्षा देणारी योजनाही सुरू केली आहे.

Invest money once in this LIC Smart Pension Plan you will get a pension of Rs 12,000 for life know what the scheme is | LIC च्या या योजनेत एकदा पैसे गुंतवा; आयुष्यभर मिळेल १२ हजार रुपयांचं पेन्शन, जाणून घ्या काय आहे स्कीम?

LIC च्या या योजनेत एकदा पैसे गुंतवा; आयुष्यभर मिळेल १२ हजार रुपयांचं पेन्शन, जाणून घ्या काय आहे स्कीम?

भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ही सातत्यानं अनेक प्रकारच्या योजना आणते. त्याचप्रमाणे कंपनीनं पेन्शनचा लाभ देण्यासाठी लोकांना आर्थिक सुरक्षा देणारी योजनाही सुरू केली आहे. ही योजना प्रत्येक वर्गासाठी आहे, जी आयुष्यभर पेन्शनचा लाभ देते. हा सिंगल प्रीमियम प्लान आहे, म्हणजेच यात एकदा पैसे जमा करावे लागतील.

एलआयसीच्या स्मार्ट पेन्शन प्लानअंतर्गत (Smart Pension Plan) योजना सिंगल आणि जॉइंटमध्ये खाते उघडता येतं. त्यांच्यातील एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीला आयुष्यभर पेन्शनचा लाभ मिळत राहील. या योजनेत निवृत्तीनंतर पेन्शनचा लाभ दिला जातो. याशिवाय तात्काळ पेन्शन देण्याचीही तरतूद आहे. 

पेन्शन कधी मिळेल? 

कोणताही नागरिक या पेन्शन योजनेचा लाभ घेऊ शकतो. स्मार्ट पेन्शन योजनेअंतर्गत पॉलिसीधारक मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर पेन्शन घेऊ शकतात. या योजनेअंतर्गत अॅन्युइटीचाही लाभ दिला जातो. पॉलिसीधारकांनंतर नॉमिनीला या योजनेचा लाभ दिला जाईल.

कोठून विकत घेऊ शकता? 

एलआयसीची स्मार्ट पेन्शन योजना आपण एलआयसीच्या वेबसाइटवरून ऑनलाइन (ऑनलाइन खरेदी) किंवा एलआयसी एजंट, पीओएसपी-लाइफ इन्शुरन्स आणि कॉमन पब्लिक सर्व्हिस सेंटरद्वारे ऑफलाइन खरेदी करू शकता.

योजनेची खास वैशिष्ट्ये

वयाची पात्रता :

या स्कीममध्ये एन्ट्रीचं किमान वय १८ वर्षे आहे, ज्यामुळे तरुण गुंतवणूकदार लवकर नियोजन करू शकतात. निवडलेल्या अॅन्युइटी पर्यायानुसार एन्ट्रीचं कमाल वय ६५ ते १०० वर्षे आहे.

फ्लेक्सिबल अ‍ॅन्युइटी ऑप्शन

सिंगल लाइफ अ‍ॅन्युइटी : ही अ‍ॅन्युइटी पेआउट आयुष्यभराची तरतूद करते.
जॉईंट लाइन अ‍ॅन्युइटी: प्रायमरी अ‍ॅन्युइटन्ट आणि सेकंडरी अॅन्युइटटन्ट (जसे की जोडीदार) दोघांसाठी अ‍ॅन्युइटी सुरू राहील, याची खात्री केली जाते.

इन्सेन्टिव्हचीही सुविधा

सध्याच्या एलआयसी पॉलिसीधारकांच्या नॉमिनी आणि लाभार्थींसाठी हायर अ‍ॅन्युइटी रेट दिला जातो. ज्यामुळे ही योजना अतिशय लाभदायक बनते. याशिवाय ही पॉलिसी काही अटींसह पार्शिअल अथवा पूर्ण विड्रॉलचा पर्यायही देते, यामुळे पॉलिसीधाकांना गरज भासल्यास फायनान्शिअल फ्लेक्सिबलिटी मिळते.

किती गुंतवणूक करावी? 

गुंतवणुकीबद्दल बोलायचं झालं तर या योजनेअंतर्गत तुम्हाला कमीत कमी १ लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. पती-पत्नी संयुक्तपणे खातं उघडून पेन्शन योजनेचा लाभ घेऊ शकतात. पेन्शन मिळवण्यासाठी तुम्हाला एकाच वेळी पूर्ण प्रीमियम भरावा लागतो. जास्तीत जास्त गुंतवणुकीची मर्यादा नाही. आपल्या गुंतवणुकीच्या आधारेच तुम्हाला पेन्शनचा लाभ दिला जातो.

किती पेन्शन मिळेल?

जर तुम्हाला दरमहा पेन्शन मिळवायची असेल तर तुम्हाला किमान १००० रुपये पेन्शन मिळू शकते, दर तीन महिन्यांनी पेन्शन हवं असेल तर ३००० रुपये, सहा महिन्यांनी हवी असल्यास ६००० रुपये पेन्शन घ्यायची असेल आणि दरवर्षी पेन्शन घ्यायची असेल तर किमान १२००० रुपये पेन्शन मिळू शकते.

Web Title: Invest money once in this LIC Smart Pension Plan you will get a pension of Rs 12,000 for life know what the scheme is

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.