नवी दिल्ली : सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) आणि सुकन्या समृद्धी यांसारख्या लोकप्रिय अल्प बचत योजनांच्या व्याजदरात चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीसाठी (जानेवारी ते मार्च २०२६) कोणताही बदल न करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. विशेष म्हणजे, सलग सातव्या तिमाहीत हे व्याजदर स्थिर ठेवण्यात आले आहेत.
वित्त मंत्रालयाने बुधवारी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, १ जानेवारी २०२६ पासून सुरू होणाऱ्या तिमाहीसाठी जुनेच व्याजदर लागू राहतील.
प्रमुख योजनांचे व्याजदर -
योजना व्याजदर
सुकन्या समृद्धी योजना ८.२%
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ७.७%
किसान विकास पत्र ७.५%
मासिक उत्पन्न योजना ७.४%
पीपीएफ ७.१%
३ वर्षांची मुदत ठेव ७.१%
बचत खाते ४.०%
