Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > व्याजदर कपात याच आठवड्यात ?

व्याजदर कपात याच आठवड्यात ?

केंद्रीय अर्थसंकल्पाच्या माध्यमातून कृषी, ग्रामविकास आणि पायाभूत क्षेत्राच्या सशक्तीकरणासाठी भक्कम आर्थिक तरतूद करत अर्थकारणाला चालना देणाऱ्या घोषणा केल्यानंतर आता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2016 03:54 IST2016-03-03T03:54:52+5:302016-03-03T03:54:52+5:30

केंद्रीय अर्थसंकल्पाच्या माध्यमातून कृषी, ग्रामविकास आणि पायाभूत क्षेत्राच्या सशक्तीकरणासाठी भक्कम आर्थिक तरतूद करत अर्थकारणाला चालना देणाऱ्या घोषणा केल्यानंतर आता

Interest rates cut this week? | व्याजदर कपात याच आठवड्यात ?

व्याजदर कपात याच आठवड्यात ?

मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्पाच्या माध्यमातून कृषी, ग्रामविकास आणि पायाभूत क्षेत्राच्या सशक्तीकरणासाठी भक्कम आर्थिक तरतूद करत अर्थकारणाला चालना देणाऱ्या घोषणा केल्यानंतर आता व्याजदर कपातीचा चेंडू सरकारने रिझर्व्ह बँकेच्या कोर्टात टाकला असून, अर्थतज्ज्ञांच्या मते येत्या आठवड्यात रिझर्व्ह बँकेतर्फे रेपोदरात पाव टक्का कपात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
अर्थसंकल्पातील या भरीव तरतुदीनंतर आणि देशाच्या अर्थकारणातील सुधाराच्या पार्श्वभूमीवर नव्या आर्थिक वर्षात किमान पाऊण टक्क्यापर्यंत व्याजदरात कपात करण्यास वाव असल्याचे मत अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँक कशी आणि किती प्रमाणात दर कपात करते याकडे बाजाराचे लक्ष लागले आहे. अर्थतज्ज्ञांच्या मते जरी आता आगामी पतधोरण ५ एप्रिल रोजी (नव्या आर्थिक वर्षात) मांडले जाणार असले तरी त्या अगोदरच व्याजदरात पाव टक्का कपात करण्याची घोषणा या आठवड्यात होऊ शकते.
अर्थतज्ज्ञ अजित जोशी यांच्यामते, अत्यंत महत्वाच्या घटकांसाठी सरकारने भांडवली खर्चाची भक्कम तरतूद केल्याचे दिसते. (प्रतिनिधी)

Web Title: Interest rates cut this week?