Lokmat Money > बिझनेस न्यूज > Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट

Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट

रिझर्व्ह बँकेनं गेल्या आठवड्यात रेपो दरात ०.५ टक्क्यांची कपात करून तो ५.५ टक्क्यांवर आणला होता. त्याचबरोबर रिझर्व्ह बँकेने कॅश रिझर्व्ह रेशो (सीआरआर) मध्येही १ टक्क्यांची कपात केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 13:55 IST2025-06-12T13:50:05+5:302025-06-12T13:55:54+5:30

रिझर्व्ह बँकेनं गेल्या आठवड्यात रेपो दरात ०.५ टक्क्यांची कपात करून तो ५.५ टक्क्यांवर आणला होता. त्याचबरोबर रिझर्व्ह बँकेने कॅश रिझर्व्ह रेशो (सीआरआर) मध्येही १ टक्क्यांची कपात केली आहे.

interest rate cut home and car loans became cheaper these 3 canara iob union bank gave a big gift to customers | Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट

Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट

Loan Interest Rate Cut: रिझर्व्ह बँकेनं गेल्या आठवड्यात रेपो दरात ०.५ टक्क्यांची कपात करून तो ५.५ टक्क्यांवर आणला होता. त्याचबरोबर रिझर्व्ह बँकेने कॅश रिझर्व्ह रेशो (सीआरआर) मध्येही १ टक्क्यांची कपात केली आहे. रेपो दरात कपात केल्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनीही कर्जावरील व्याजदरात कपात करण्यास सुरुवात केली आहे. युनियन बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक आणि इंडियन ओव्हरसीज बँक (आयओबी) या सार्वजनिक क्षेत्रातील तीन बँकांनी कर्जाच्या व्याजदरात ०.५० टक्क्यांपर्यंत कपात केली. तज्ज्ञांच्या मते, बँकांच्या या निर्णयामुळे गृह, वाहन, वैयक्तिक आणि एमएसएमई कर्ज घेणाऱ्यांना दिलासा मिळेल, ज्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावरील भार कमी होईल.

यापूर्वी बँक ऑफ बडोदानंही आपल्या आरएलएलआरमध्ये ०.५० टक्के कपात केली होती. खासगी बँक एचडीएफसी बँकेनं विविध कालावधीसाठी मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेटमध्ये (एमसीएलआर) ०.१० टक्के कपात केली आहे. याचा फायदा त्या ग्राहकांना होणार आहे ज्यांचं कर्ज एमसीएलआरशी जोडलेलं आहे.

Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

युनिअन बँकेच्या ग्राहकांना दिलासा

युनियन बँक ऑफ इंडियानं एक्सटर्नल स्टँडर्ड बेस्ड इंटरेस्ट रेट (ईबीएलआर) आणि रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (आरएलएलआर) ०.५० टक्क्यांनी कमी केलाय. आरबीआयच्या रेपो दरात कपातीच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आल्याचं बँकेनं म्हटलंय. यामुळे बँकेशी संबंधित ग्राहकांना आता स्वस्त दरात कर्ज मिळू शकणार आहे.

इंडियन ओव्हरसिज बँकेनंही केली कपात

इंडियन ओव्हरसीज बँकेनं (आयओबी) कर्जाच्या व्याजदरात ०.५० टक्क्यांची कपात केली आहे. बँकेच्या मालमत्ता-दायित्व व्यवस्थापन समितीच्या (ALCO) बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आता आयओबीचा रेपो आधारित व्याजदर (आरएलएलआर) ८.३५ टक्क्यांवर आला आहे, जो पूर्वी ८.८५ टक्के होता.

कॅनरा बँकेकडूनही दिलासा

कॅनरा बँकेनंही त्यांच्या रेपो आधारित व्याजदरात ०.५० टक्के कपात करण्याची घोषणा केली आहे. बँकेच्या म्हणण्यानुसार, आता नवीन आरएलएलआर दर ८.७५ टक्क्यांवरून ८.२५ टक्के झाला आहे. हे नवीन दर बुधवारपासून लागू करण्यात आलेत.

Web Title: interest rate cut home and car loans became cheaper these 3 canara iob union bank gave a big gift to customers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक