Lokmat Money > बिझनेस न्यूज > महागाईचा भडका; सीएनजीच्या दरात आजपासून १.५ रुपयांनी वाढ

महागाईचा भडका; सीएनजीच्या दरात आजपासून १.५ रुपयांनी वाढ

सीएनजीवर चालणाऱ्या टॅक्सी, रिक्षा आणि इतर वाहनचालकांना याचा थेट फटका बसणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 09:22 IST2025-04-09T09:21:19+5:302025-04-09T09:22:15+5:30

सीएनजीवर चालणाऱ्या टॅक्सी, रिक्षा आणि इतर वाहनचालकांना याचा थेट फटका बसणार आहे.

Inflation flares up CNG price hiked by Rs 1.5 from today | महागाईचा भडका; सीएनजीच्या दरात आजपासून १.५ रुपयांनी वाढ

महागाईचा भडका; सीएनजीच्या दरात आजपासून १.५ रुपयांनी वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई आणि परिसरातील सीएनजी वापरकर्त्यांना आता आणखी खर्चाचा फटका बसणार आहे. महानगर गॅस लिमिटेड (एमजीएल)ने सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीत वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ आज बुधवारपासून लागू होणार आहे. 

नवीन दरानुसार, सीएनजीची किंमत प्रतिकिलो १.५० रुपयांनी वाढून आता ७९.५० रुपये प्रतिकिलो झाली आहे. घरगुती वापरासाठी वापरल्या जाणाऱ्या पाइप नैसर्गिक वायू (पीएनजी)ची किंमत १ रुपयाने वाढली असून, आता ४९ रुपये प्रती एससीएम झाली आहे.
ही दरवाढ मुंबईसह उपनगरांमध्ये लाखो ग्राहकांवर परिणाम करणार आहे. विशेषतः सीएनजीवर चालणाऱ्या टॅक्सी, रिक्षा आणि इतर वाहनचालकांना याचा थेट फटका बसणार आहे.

दरम्यान, आधीच इंधन व जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्याने नागरिकांवर आर्थिक ओझे वाढणार आहे. 

Web Title: Inflation flares up CNG price hiked by Rs 1.5 from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.