Lokmat Money > बिझनेस न्यूज > यंदा भारताचा विकासदर तीन टक्क्यांहूनही कमी

यंदा भारताचा विकासदर तीन टक्क्यांहूनही कमी

भारतात खुले आर्थिक धोरण स्वीकारल्यानंतरचा सर्वात कमी दर लॉकडाउन, व्यापार-उद्योग आणि वाहतूक बंद पडल्याने नुकसान सेवा क्षेत्राला सर्वात मोठा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 06:44 IST2020-04-13T06:44:47+5:302020-04-13T06:44:58+5:30

भारतात खुले आर्थिक धोरण स्वीकारल्यानंतरचा सर्वात कमी दर लॉकडाउन, व्यापार-उद्योग आणि वाहतूक बंद पडल्याने नुकसान सेवा क्षेत्राला सर्वात मोठा फटका

India's growth rate is less than three percent this year | यंदा भारताचा विकासदर तीन टक्क्यांहूनही कमी

यंदा भारताचा विकासदर तीन टक्क्यांहूनही कमी

वॉशिंग्टन : कोरोना संकटामुळे करावे लागलेले देशव्यापी ‘लॉकडाउन’ व अनपेक्षित वाढलेल्या खर्चामुळे नियोजित अर्थसंकल्पाचे पार विस्कटून गेलेले गणित याचा परिणाम म्हणून १ एप्रिलपासून सुरू झालेल्या नव्या वित्तीय वर्षात भारताचा विकासदर गेल्या ३० वर्षांत कधीही नव्हता एवढा खाली घसरेल, असे चिंताजनक भाकीत जागतिक बँकेने केले आहे.

बँकेने शनिवारी प्रसिद्ध केलेल्या ‘साऊथ एशिया इकॉनॉमिक फोकस रिपोर्ट’मध्ये असे नमूद केले की, सन २०२०-२१ या चालू वित्तीय वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर १.५ ते २.८ टक्के राहील, असे चित्र दिसत आहे. खरंच तसे झाले तर सन १९९१ मध्ये खुल्या आर्थिक धोरणाचा अवलंब केल्यापासून देशाचा आर्थिक विकासाचा हा सर्वात कमी दर असेल. वित्तीय क्षेत्रातील दीर्घकालीन दौर्बल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था आधीच मंदावलेली असताना हे नवे संकट आल्याने त्याचा अधिक जास्त दुष्परिणाम जाणवेल, असेही अहवाल म्हणतो.
बँक म्हणते की, ‘लॉकडाउन’, कारखाने व व्यापार-उदिम बंद होणे, रेल्वे आणि विमानसेवा ठप्प होणे या सर्वाचा मागणी व पुरवठा या दोन्हींना फटका बसेल. परदेशातील मागणीही थंडावली असल्याने एकूणच या वर्षात अर्थव्यवस्थेची वेगाने घसरण होईल. खासकरून सेवा क्षेत्राला सर्वात जास्त फटका बसेल. (वृत्तसंस्था)

सावरण्यासाठी प्रयत्न सुरु
कोरोनाचा भारतीय अर्थव्यवस्थेला कमीत कमी फटका बसावा आणि अर्थव्यवस्थेला लवकर उभारी यावी यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी अर्थमंत्री, त्यांचे अधिकारी तसेच केंद्रातील मंत्रिगट यांनी तयारी सुरू केली आहे.

कोरोना संकटामुळे जागतिक बँकेचा अंदाज

Web Title: India's growth rate is less than three percent this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.