India Exports November 2025 : केंद्र सरकारने आज, सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतीय अर्थव्यवस्थेसाठी दिलासादायक बातमी आहे. देशाच्या निर्यातीत नोव्हेंबर महिन्यात मोठी वाढ झाली असून, आयातीत घट झाल्याने व्यापार तुटीवरचा दबाव काहीसा कमी झाला आहे. याचा थेट परिणाम शेअर बाजारातही पाहायला मिळणार आहे.
नोव्हेंबरमधील निर्यात-आयात स्थिती
नोव्हेंबरमध्ये भारताची निर्यात १९.३७ टक्क्यांनी वाढून ३८.१३ अब्ज अमेरिकन डॉलर झाली. तर याच कालावधीत आयात १.८८ टक्क्यांनी घसरून ६२.६६ अब्ज अमेरिकन डॉलर झाली. वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी सांगितले की, नोव्हेंबरमधील ३८.१३ अब्ज डॉलर ही निर्यात गेल्या १० वर्षांतील सर्वाधिक आहे. या वाढीमुळे ऑक्टोबरमधील नुकसानीची भरपाई झाली आहे. नोव्हेंबरमध्ये व्यापार तूट २४.५३ अब्ज अमेरिकन डॉलर इतकी नोंदवली गेली.
एप्रिल ते नोव्हेंबर (२०२५) पर्यंतची एकत्रित आकडेवारी
एकूण निर्यात २.६२ टक्क्यांनी वाढून २९२.०७ अब्ज अमेरिकन डॉलर झाली. त्याचवेळी एकूण आयात ५.५९ टक्क्यांनी वाढून ५१५.२१ अब्ज अमेरिकन डॉलर इतकी राहिली.
घाऊक महागाई दर नकारात्मकच
नोव्हेंबर महिन्यात घाऊक चलनवाढ दर वार्षिक आधारावर ०.३२ टक्क्यांनी कमी झाला आहे.
या घसरणीची मुख्य कारणे
- खनिज तेल
- खाद्यपदार्थ
- कच्चे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूच्या किमतीत झालेली घट.
- ऑक्टोबरमध्ये घाऊक चलनवाढ दर १.२१ टक्के होता, तर आता तो ०.३२ टक्के आहे. ही घट किरकोळ असली तरी, एकूण महागाई अजूनही शून्य टक्क्यांपेक्षा खाली (नकारात्मक) आहे.
महागाईच्या आघाडीवर दिलासा
नोव्हेंबरमधील आकडेवारीतून संकेत मिळत आहेत की, महागाईचा सर्वात कठीण काळ आता मागे पडला आहे. खाद्यपदार्थांच्या किमतींचा दबाव अजूनही असला तरी, त्यांच्या घसरणीचा वेग आता मंद झाला आहे.
अन्न निर्देशांक नरमल्याची कारणे
- खाद्यपदार्थांच्या किमतींनी घाऊक महागाई कमी करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
- भाजीपाल्यांच्या दरात मोठी घसरण झाल्यानंतर आता ते स्थिर झाले आहेत.
- बटाटे आणि कांद्याच्या किमती मागील वर्षाच्या तुलनेत खूपच कमी राहिल्या आहेत, ज्यामुळे त्यांचा पुरवठा मजबूत असल्याचे दिसून येते.
वाचा - सिमेंटपासून डेटा सेंटरपर्यंत... अदानी ग्रुपने २०२५ मध्ये 'या' कंपन्या केल्या खरेदी; कुठे वाढली ताकद?
एकंदरीत, निर्यात वाढल्याने आणि महागाई आटोक्यात राहिल्याने भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ही आकडेवारी सकारात्मक मानली जात आहे.
